- मालोजीराजे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने लंडन येथे सन्मान
कोल्हापूर
लंडन येथे लोकमत समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’च्या दुसऱ्या पर्वात माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांना ‘महाराष्ट्र रत्न’ या पुरस्काराचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते व उद्योजक सुनीलजी शेट्टी, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजयजी दर्डा, अभय भुतडा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. अभयजी भुतडा तसेच सॉलिटेअर ग्रुप व व्हीटीपी ग्रुपचे संचालक श्री. प्रमोदजी रांका यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मालोजीराजे म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीत योगदान देताना हा सन्मान माझ्या कार्याची खरी पावती देणारा आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असून पुढच्या महाराष्ट्राला अधिक प्रगत, सक्षम व भविष्याभिमुख बनवण्यासाठी सातत्याने योगदान देत राहीन. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक विचार प्रभाविपणे पुढे नेत असताना माझे वडील खासदार शाहू छत्रपती यांचे मौलिक मार्गदर्शन माझ्यासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
एआयएसएसएमएसच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून उद्याच्या भारताचे भविष्य घडवण्याचा माझा सातत्याने प्रयत्न आहे. देशाला सर्वोच्च पातळीवर नेण्यासाठी तज्ज्ञ युवा पिढी घडविण्याचा तसेच महाराष्ट्राबरोबरच भारताला शिक्षण क्षेत्राचे जागतिक केंद्र म्हणून पुढे नेण्याचा एआयएसएसएमएसच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून उद्याच्या भारताचे भविष्य घडवण्याचा माझा सातत्याने प्रयत्न आहे.
देशाला सर्वोच्च पातळीवर नेण्यासाठी तज्ज्ञ युवा पिढी घडविण्याचा तसेच महाराष्ट्राबरोबरच भारताला शिक्षण क्षेत्राचे जागतिक केंद्र म्हणून पुढे नेण्याचा ध्यासही कायम राहील, ज्यात ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल (एआयएसएसएमएस) नेहमीच अग्रणी असेल.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री. राहुलजी नार्वेकर, खासदार श्री. सुनीलजी तटकरे, सामजिक न्याय मंत्री श्री. संजयजी शिरसाट, राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, आमदार श्री. सुधीरजी मुनगंटीवार व इतर मान्यवर उपस्थित होते.