मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार
– नविद मुश्रीफ
चेअरमन गोकुळ दूध संघ
लातूर आणि नांदेड परिसरात गोकुळचा विस्ताराचा प्रयत्न
कोल्हापूर, ता.०७ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, (गोकुळ) चे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांची मराठवाड्यातील उजना मिल्क प्रोडक्टस् प्रायव्हेट लि. सुनेगाव (सांगवी) ता.अहमदपूर जि.लातूर या दूध संघास बुधवार दि.०६/०८/२०२५ इ.रोजी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान अहमदपूरचे माजी आमदार बाळासाहेब जाधव आणि अविनाश जाधव यांनी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांचे स्वागत व सत्कार केला.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले कि, राज्यातील मुंबई-पुणे परिसरासह मराठवाडा विभागातूनही गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, गोकुळ दूध संघाच्या व्यवस्थापनाने लातूर आणि नांदेड परिसरातील स्थानिक दूध संघांची भेट घेऊन प्रत्यक्ष आढावा घेतला. सहकार मंत्री व उजना मिल्कचे चेअरमन नामदार बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या उजना मिल्क या दूध संघाच्या माध्यमातून गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ या भागांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच या विभागांतही गोकुळचे दूध व दर्जेदार उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत.
भेटीदरम्यान श्री.मुश्रीफ यांनी डेअरीतील विविध यंत्रणा, कार्यपद्धती आणि तांत्रिक सुविधांची सविस्तर पाहणी केली. दूध संकलन प्रक्रियेची सखोल माहिती डेअरीचे मॅनेजर संदीप पाटील यांनी दिली.
या प्रसंगी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, अहमदपूरचे माजी आमदार बाळासाहेब जाधव, गोकुळचे संचालक युवराज पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, प्रा. किसन चौगले, बिद्री साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मनोज फराकटे, अविनाश जाधव, सुरज पाटील, संचालक डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, वरिष्ठ दूध संकलन अधिकारी सर्जेराव पाटील व मार्केटिंग अधिकारी शिवाजी चौगले यांची उपस्थित होत.
—————————————————————————————————-
फोटो ओळ – यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे स्वागत करताना अहमदपूरचे माजी आमदार बाळासाहेब जाधव उपस्थित गोकुळचे संचालक युवराज पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, प्रा. किसन चौगले, बिद्री साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मनोज फराकटे, अविनाश जाधव, सुरज पाटीलआदि दिसत आहेत.
—————————————————————————————————-