ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. जयसिंगराव पवार- सर यांच्या निधनाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची प्रतिक्रिया….!

Spread the news

ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. जयसिंगराव पवार- सर यांच्या निधनाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची प्रतिक्रिया….!

­

 

करवीर संस्थापिका महाराणी ताराराणीसाहेब यांचे भव्य स्मारक उभारणे हीच कै. जयसिंगराव पवार यांना खरी आदरांजली ठरेल……!

  •  

कै. जयसिंगराव पवार हे एक थोर इतिहास संशोधक होते. त्यांचे वाचन, अभ्यास आणि त्यांनी केलेले संशोधन हे अत्यंत प्रगाढ असे होते. इतिहासातील अनेक महापुरुषांचा खरा इतिहास समाजासमोर आणण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे प्रयत्न केला. गेले अनेक दिवस ते मृत्युशी झुंज देत होते. अशा इतिहास संशोधक, इतिहास तज्ञ आणि खऱ्या इतिहासकाराचे दुर्दैवाने आज निधन झाले. नियतीने त्यांना आपणा सर्वांच्यातून हिरावून नेले आहे. त्यांना माझे विनम्र अभिवादन…..!

माझे आणि त्यांचे अतिशय जवळचे ऋणानुबंध होते. सेनापती कापशी ता. कागल येथे उभारलेले महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक असेल. तसेच; करवीर संस्थापिका महाराणी ताराराणीसाहेब यांचे स्मारक असेल. त्यांचा जाज्वल्य इतिहास समाजासमोर मांडला. सरसेनापती संताजी घोरपडे आणि सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या तेजस्वी शौर्याची मुघलांमध्ये किती भीती होती, हा जाज्वल्य इतिहासही त्यांनी मांडला.
त्यांच्या अभ्यास, संशोधन आणि संकल्पनेतून साकारलेला सरसेनापती संताजी घोरपडे यांचा पुतळा व स्मारक तर मराठा इतिहासाच्या तेजस्वी शौर्याचे जिवंत प्रतिकच आहे. करवीर संस्थापिका महाराणी ताराराणीसाहेब यांचा खरा इतिहास त्यांनी मांडला. त्यांचे स्मारक होण्यासाठी त्यांची अतिशय तळमळ होती. महाराणी ताराराणीसाहेबांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशनावेळी तशी भूमिकाही त्यांनी मांडली होती.

आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वजण सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते मिळून करवीर संस्थापिका महाराणी ताराराणीसाहेब यांचे भव्य असे स्मारक उभे करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल……!


Spread the news

You may also like

error: Content is protected !!