*मंत्री हसन मुश्रीफ यांची रणजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट*
*मुरगूड, दि. १३:*
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह विश्वनाथराव पाटील यांच्या मुरगुड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीप्रसंगी मुरगूड व पंचक्रोशीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
करवीरचे राहुल पाटील व राधानगरीचे अरुण डोंगळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी रणजितसिंह पाटील आणि राजेखान जमादार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सकाळी मुरगूड येथे रणजितसिंह पाटील यांच्या घरी भेट देऊन त्यांचे आणि कुटुंबीयांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. यावेळी शिवसेना (शिंदे गट) मधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले जिल्हाध्यक्ष राजेखान जमादारही उपस्थित होते. पाटील कुटुंबीयांच्यावतीने विश्वजीतसिंह व पद्मसिंह रणजितसिंह पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांचे स्वागत केले. तसेच सौ. मंजुषादेवी रणजितसिंह पाटील आणि सौ. पूजा पद्मसिंह पाटील आदी कुटुंबीयही यावेळी उपस्थित होत्या.
या भेटीच्या निमित्ताने रणजितसिंह पाटील यांनी कार्यकर्त्यांशी दिलखुलास संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर पाटील-जमादार गट आणि मुरगूड येथील मुश्रीफ गट एकसंघपणे काम करेल, असे आश्वासन स्थानिक नेत्यांनी दिले आहे. कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलनाच्या घडामोडींना वेग आला असून पंचक्रोशीतील सुमारे ५० गावांतून या प्रवेशाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले आहे.
या प्रसंगी राजेखान जमादार, दत्ता पाटील- केनवडेकर, सूर्यकांत पाटील, दिनकर कोतेकर, विकास पाटील, बी. एम. पाटील, संतोष वंडकर, डॉ. सुनील चौगुले, रणजीत सूर्यवंशी, राजू आमते, बजरंग सोनुले, दत्तामामा जाधव, डॉ. अशोक खंडागळे, बाजीराव चांदेकर, नामदेव भांदिगरे, नामदेव एकल, केतन मगदूम, शिवाजी पाटील, रघुनाथ अस्वले, रमेश परीट, रणजीत मगदूम, अमर देवळे व पंकज नेसरीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
……….
*मुरगुड- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील यांच्या मुरगुड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.*
========