कोल्हापुरात गव्हर्मेंट लॉ कॉलेज सुरू करा -आमदार अमल महाडिक यांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

Spread the news

*कोल्हापुरात गव्हर्मेंट लॉ कॉलेज सुरू करा -आमदार अमल महाडिक यांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
कोल्हापूर – कोल्हापूर शहरामध्ये नुकतेच उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कार्यान्वित झाले आहे. कोल्हापूरकरांच्या गेल्या अनेक वर्षांच्या या सर्किट बेंचच्या रूपाने यश आले आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक खटले सर्किट बेंचच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. सर्किट बेंचच्या नूतन इमारतीचे बांधकाम शेंडा पार्क परिसरामध्ये होणार आहे. लवकरच उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विधी क्षेत्रात नवनव्या संधी तरुणांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरचा विचार करता जिल्ह्यामध्ये दोन खाजगी विधी महाविद्यालय कार्यरत आहेत. त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित आहे. भविष्यातील संधींचा विचार करता कोल्हापूरमध्ये शासकीय विधी महाविद्यालय सुरू होणे गरजेचे आहे.
ही बाब ध्यानात घेऊन आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे कोल्हापुरात गव्हर्मेंट लॉ कॉलेज सुरू करण्यासाठी मागणी केली आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांची भेट घेऊन आमदार महाडिक यांनी ही मागणी केली.
भविष्यातील संधी लक्षात घेता विदिशाखेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. कोल्हापुरात सध्या अस्तित्वात असणारी विधी महाविद्यालये अपुरी पडणार असल्यामुळे शासकीय विधी महाविद्यालय झाल्यास सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना कायद्याचा अभ्यास करणे सुलभ जाणार आहे.
त्यामुळे या पत्राचा तातडीने विचार करण्याची मागणी आमदार महाडिक यांनी केली.
यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!