पदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार राजेश क्षीरसागर

Spread the news

पदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर दि.०९ : राज्यात विधानसभा, महापालिका, जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित काम महायुती सरकारकडून सुरु असून, जनतेचा महायुतीवर संपूर्ण विश्वास आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, याही निवडणुकामध्ये विरोधकांना चारीमुंड्या चीत करून या मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
यात पुढे म्हंटले आहे कि, आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने शिवसेनेने पुणे पदवीधर मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर या पाच जिल्ह्यात प्रत्येक पात्र व जागरूक पदवीधराची मतदार नोंदणी करणे, त्याच्याशी शिवसेनेची नाळ जोडणे, स्वावलंबी बनविणे हा संकल्प केला आहे. आतापर्यंतच्या नोंदणीमध्ये संख्यात्मकदृष्ट्या कोल्हापूरने अग्रस्थान प्राप्त केले आहे. यापुढेही कोल्हापूर जिल्ह्यातून अशाच पद्धतीने जास्तीत जास्त नोंदणी करण्याचा शिवसेनेचा उद्देश आहे. ही निवडणूक निश्चितच महायुती म्हणूनच लढविली जाणार आहे. पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या निवडणुकीत कोल्हापूरची दावेदारी कायम राहण्यासाठी शिवसेनेने जास्तीत जास्त मतदार नोंदणीचा उद्देश ठेवला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्वच पदाधिकारी व शिवसैनिकांनी या निवडणुकीच्या अनुषंगाने सज्ज व्हावे. भागातील जास्तीत जास्त पात्र पदवीधरांची मतदार नोंदणी करावी. मतदार नोंदणी करण्यासाठी पात्र पदवीधरांनी “शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर” या कार्यालयाशी संपर्क साधून आपली हक्काची व बहुमुल्य पदवीधर मतदार नोंदणी करावी, असे आवाहन ही आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!