*महानगरपालिका जिंकण्यास महायुती सक्षम : आमदार श्री.राजेश क्षीरसागर*
*कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर शिवसेनेची पदाधिकारी बैठक*
कोल्हापूर दि.०८ : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरवात झाली आहे. राज्यात सर्वच ठिकाणी महायुतीबाबत सकारात्मक वातावरण आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेली लाडकी बहीण योजना, सद्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत घेतले जात असलेले लोकहिताचे निर्णय यामुळे सर्वसामान्य नागरीकांचा कौल महायुतीच्या बाजूनेच आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणूक जिंकण्यास महायुती सक्षम आहे. परंतु, गाफील न राहता नवीन सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, शाखा उद्घाटन, शासनाच्या योजना यामाध्यमातून जनसंपर्क वाढवा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळांचे कार्यकरी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकाऱ्याची बैठक पार पडली.
याप्रसंगी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, गेल्या तीन वर्षांच्या काळात महायुती सरकारने लाडकी बहीण, मुलींना मोफत उच्च शिक्षण, एस.टी.प्रवासात सवलत असे जनहिताचे निर्णय घेतले. कोल्हापूर शहराचा विचार करता महानगरपालिकेत ५०६ कंत्राटी कर्मचारी कायम करणे, रु.१०० कोटींचे रस्ते, केशवराव भोसले नाट्यगृह संवर्धन व पुनर्बांधणी, रंकाळा तलाव सुशोभिकरण, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, हद्दवाढीबाबत सकारात्मक भूमिका या सर्वांचा सारासार विचार करता शहरातील मतदार महायुतीच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. शहर विकासाद्वारे शहराचे बदलत चाललेले रुप त्यातून मतदारांच्या व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया यातून नागरिकांनीच महायुतीला निवडून देण्याचे मनोमन ठरविले आहे. त्यामुळे विविध माध्यमातून जनसंपर्क निर्माण करण्यावर भर द्यावे. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. येणारी महानगरपालिका महायुती एकजुटीने लढवून, जिंकून दाखवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
*बाहेरून येणाऱ्यांचे स्वागतच.. पण, महायुती पूर्वीपासूनच सक्षम कोणावरही अवलंबून नाही : आमदार राजेश क्षीरसागर*
आगामी महानगरपालिका महायुती सक्षमपणे लढवून जिंकणारच आहे. एकूणच राज्यात महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी एकजुटीने सुरु केलेली लोकहिताच्या कामाची पद्धत नागरिकांच्या पसंतीस पडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सामील होण्यासाठी अनेकांची रीघ लागली आहे. येणाऱ्या सर्वांचे स्वागतच आहे, परंतु, महायुती कोणावरही अवलंबून नाही हे गेल्या विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या बळावर आणि मतदारांनी दिलेल्या कौलावर दिसून आले आहे, असेही आमदार श्री.राजेश क्षीरसागर म्हणाले.
या बैठकीस जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, रणजीत मंडलिक, दीपक चव्हाण, शहर समन्वयक सुनील जाधव, गणेश रांगणेकर, कमलाकर जगदाळे, तन्वीर बेपारी, अनुसूचित जाती जमाती शहरप्रमुख प्रभू गायकवाड, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, अंकुश निपाणीकर, विनय वाणी, मुकुंद सावंत, कपिल केसरकर, कृष्णा लोंढे, आदर्श जाधव, संदीप चीगरे, देवेंद्र खराडे, मुन्ना तोरस्कर, अमर क्षीरसागर आदी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.