*नागपूरमधून सुरू झाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा महाराष्ट्र दौरा*
समाज माध्यमांमध्ये प्रभावी ठरलेल्या युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नागपूरमधून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. नागपूर आणि वर्धा शहरातील सामाजिक, राजकीय आणि डिजीटल क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. प्रारंभी नागपूरमध्ये भाजप कार्यालयाला भेट देवून, युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तरूणांना संधी आणि डिजीटल माध्यमांचा सकारात्मक उपायोग या विषयावर त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तर नागपूरमधील जापनिज गार्डन इथं कृष्णराज यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची भेट घेतली. यावेळी सुमारे तीनशेपेक्षा अधिक तरूण-तरूणी कृष्णराज यांना भेटण्यासाठी प्रचंड उत्साहाने आले होते. त्या सर्वांशी मनमोकळा संवाद साधत, कृष्णराज यांनी आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यानंतर नागपूरचे आमदार परिणय फुके यांच्या निवासस्थानी जावून फुके कुटुंबियांशी संवाद साधला. तरूणांसाठी रोजगारनिर्मिती, स्टार्टअपना चालना आणि क्रीडा क्षेत्राचा विकास याबाबत कृष्णराज महाडिक यांनी भूमिका मांडली. दरम्यान वर्धा येथे राज्यमंत्री नामदार पंकज भोयर यांनी विदर्भ क्रिएटर्स कॉंक्लेव्हचे आयोजन केले होते. त्यासाठी कृष्णराज महाडिक यांना निमंत्रित करण्यात आले होते. कृष्णराज यांनी वर्ध्यातील या मेळाव्याला उपस्थित राहून सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग, समाजावर होणारा परिणाम याबाबत विवेचन केले. त्यातून कृष्णराज यांनी विदर्भातील तरूण सोशल मीडिया क्रिएटरना एक दिशा दिली. सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम असून त्याचा उपयोग सामाजिक एकीसाठी, विकासासाठी आणि सकारात्मक विचार वाढीसाठी करता येतो असे प्रतिपादन कृष्णराज महाडिक यांनी केले. विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या आणि सोशल मीडियावर कार्यरत असलेल्या तरुणांशी कृष्णराज महाडिक यांनी प्रेरणादायी संवाद साधला.
त्यानंतर नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेसाठी निमंत्रित अतिथी म्हणून कृष्णराज महाडिक यांनी हजेरी लावली. राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या या स्पर्धेत देशभरातील नामवंत कब्बडीपटूंचा सहभाग होता. सामाजिक कार्यासह क्रीडा क्षेत्रात भरघोस योगदान दिल्याबद्दल कृष्णराज महाडिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णराज यांनी खेळांचे महत्व स्पष्ट करत, आत्मविश्वास, शिस्त, आरोग्य संवर्धन, खिलाडूवृत्ती आणि संघभावना यासाठी खेळांचे महत्व असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या खेलो इंडिया अभियानाचे महत्व त्यांनी विषद केले. नागपूरमधून महाराष्ट्र दौर्याची सुरूवात झाली असून, अत्यंत सकारात्मक आणि उत्साही प्रतिसाद मिळत असल्याबद्दल, कृष्णराज महाडिक यांनी आपले फॉलोअर, तरूण कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी यांच्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.