राष्ट्रवादी  शरद पवार गट महापालिका निवडणुका ताकतीने लढवणार – व्ही.बी. पाटील*

Spread the news

 

*राष्ट्रवादी  शरद पवार गट महापालिका निवडणुका ताकतीने लढवणार – व्ही.बी. पाटील*

होऊ घातलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2025 या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे कार्यकर्त्यांचा मेळावा चंदूकाका सराफ शॉप खालील हॉलमध्ये संपन्न झाला.
प्रास्ताविक स्वागत सरचिटणीस सुनील देसाई यांनी केले व महापालिका निवडणूकीस इच्छुक असणाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशा सूचना केल्या. यावेळी शर्मिला सामंत यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी आर्थिक पाठबळ द्यावे अशी सूचना केली. किसन कल्याणकर यांनी खऱ्या ओबीसींना तिकीट द्यावे अशी भावना व्यक्त केली. राजवर्धन यादव यांनी आमच्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या असे सांगितले. सादिक अत्तर यांनी युवकांना अधिक प्राधान्य द्यावे आम्ही कोठेही कमी पडणार नाही असे सांगितले. राजू जमादार रिक्षा संघटना अध्यक्ष यांनी शरद पवारांची एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना सहकार्य करा असे सांगितले. उत्तर अध्यक्ष गणेश जाधव यांनी पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्याचे काम केले जाईल असे सांगितले. चंद्रकांत सूर्यवंशी बूथ वाईज कमिट्या कराव्यात अशी सूचना केली. महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले यांनी लढायची तयारी ठेवा. आपला नेता स्वाभिमानी आहे. काही कमी पडणार नाही असे सांगितले. प्रदेश संघटक सचिव विनय कदम यांनी दोन पक्ष एकत्रित होणार नाहीत हे लक्षात ठेवा असे सांगितले. बाजीराव खाडे यांनी शहरातील संघटना मजबूत करण्यासाठी एकत्रित कामाची गरज असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते चंद्रकांत वाकळे यांनी पक्षाचे भवितव्य अधिक उज्वल आहे कामाला लागा अशा सूचना केल्या. यावेळी कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी येत्या चार महिन्यात शरद पवार राष्ट्रवादी यांचेच वातावरण असेल. त्यासाठी विविध आंदोलने केली जातील असे सांगितले. आर. के. पोवार यांनी अध्यक्ष म्हणून मी कोठेही कमी पडणार नाही. कार्यकर्त्यांनी पंधरा दिवसात नवीन बूथ कमिट्या कराव्या अशी सूचना केल्या.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरावे. शरद पवार पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही. निवडणुका ताकतीने लढवणार. कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. इंडिया आघाडी म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील ज्या ठिकाणी शक्य होणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील असे सांगून शरदचंद्र पवार यांची पुन्हा एकदा जादू चालेल असे सांगितले. यावेळी आभार शहर उपाध्यक्ष हिदायत मणेर यांनी मानले.
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने, निरंजन कदम करवीर तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, मकरंद जोंधळे, राजाराम पाटोळे, फिरोज सरगूर, दिनकर कांबळे, सरोजिनी जाधव, गणेश नलवडे, अमोल जाधव, अरुणा पाटील, अंजली पोळ, मुसाभाई कुलकर्णी, शिवाजी पोळ, रामराजे बदाले, रियाज कागदी इ सह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!