*नवोदीत वकिलांनी उच्च न्यायालयीन शिस्त, संवैधानिक ज्ञान आणि युक्तिवाद कौशल्ये आत्मसात करावीत*
*ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. व्ही. डी. सपकाळ यांचा सल्ला*
*शहाजी लॉ कॉलेजमध्ये “उच्च न्यायालयातील शिस्त, संधी आणि आव्हाने” या विषयावर कार्यशाळा उत्साहात*
*कोल्हापूर, दि. ८:*
नवोदित वकिलांनी उच्च न्यायालयीन शिस्त, संवैधानिक ज्ञान आणि युक्तिवाद ही महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करावीत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. व्ही. डी. सपकाळ यांनी केले.
कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचालित शहाजी लॉ कॉलेजमध्ये वकिलांसाठी ‘उच्च न्यायालयीन शिस्त – संधी आणि आव्हाने’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई विश्वनाथ मगदूम यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेला विद्यार्थी आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात ॲड. श्री. सपकाळ यांनी “मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्मितीचा इतिहास” तसेच; न्यायालयीन कार्यपद्धती” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात मुंबई उच्च न्यायालयातील सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. युवराज नरवणकर यांनी, “उच्च न्यायालयाची शिस्त आणि प्रभावी वकिली कौशल्ये,” याबाबत विस्तृतपणे मांडणी केली. तिसऱ्या सत्रात मुंबई उच्च न्यायालयातील सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. विक्रम वालावलकर यांनी “प्रभावी न्यायालयीन युक्तिवाद आणि उत्तम मसुदा” तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सदस्य ॲड. वैभव पेडणेकर, देशभक्त रत्नाप्पाअण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे प्राचार्य डॉ. यू. आर. पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डाॅ. ॲड. संतोष संतोष शहा, उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत चव्हाण, सचिव ॲड. शिवप्रसाद वंदुरे- पाटील यांनी विशेष सहकार्य झाले. उपस्थित होते. प्रा. सुहास पत्की आणि प्रा. डाॅ. अतुल जाधव यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
कार्यशाळेच्या सुरुवातीलाच शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रविण पाटील यांनी शहाजी लॉ कॉलेजच्या निर्मितीचा इतिहास आणि कार्यशाळा आयोजनामागील उद्देश सांगितला. वकिल संघटनेचे सचिव डॉ. दिगंबर पाटील यांनी प्रास्ताविक केले. शहाजी विधी महाविद्यालय माजी विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. ॲड. संतोष शहा यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन प्रा. पिनाज सनदी, प्रा. सादिया मुल्ला, प्रा. प्रवीण गुंडाळे यांनी केले. ॲड. चेतन शिंदे यांनी आभार मानले.
………..
*कोल्हापूर: शहाजी लॉ कॉलेजमध्ये आयोजित कार्यशाळेची सुरुवात स्वातंत्र्यवीर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.*
============