जनगणना करताना कोणताही गट अथवा समूह जनगणनेपासून वंचित राहू नये – वीरेंद्र दीक्षित

Spread the news

जनगणना करताना कोणताही गट अथवा समूह जनगणनेपासून वंचित राहू नये – वीरेंद्र दीक्षित

­

 

कोल्हापूर दि : 5 (जिमाका) जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.हे कर्तव्य पार पाडत असताना कोणताही गट अथवा समूह जनगणनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रत्येक पर्यवेक्षक – प्रगणकांनी घ्यायची आहे असे प्रतिपादन जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात जनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ते 6 मार्च या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे जनगणना विषयक तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, मनपा उपायुक्त परितोष कंकाळ, इचलकरंजी मनपा उपायुक्त नंदू परळकर , प्रांताधिकारी तथा उपविभागीय जनगणना अधिकारी सर्वश्री दीपक शिंदे,प्रसाद चौगुले, एकनाथ काळबांडे,हरिष सूळ,श्रीमती मोसमी बर्डे – चौगुले,जनगणना समन्वयक मयूर पवार आदी उपस्थित होते.
श्री दीक्षित यांनी ,CMMS पोर्टलवर जाऊन HLB म्हणजे (हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स) कसे क्रिएट करायचे याबाबत तर समन्वयक श्री पवार यांनी हाऊस लिस्टिंग ब्लॉक चा मॅप ले आउट कशा पद्धतीने काढायचा त्याचे प्रशिक्षण उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले.तसेच उपस्थितांना जनगणना मोजणीच्या अनुषंगाने युजर आयडी आणि पासवर्ड कसा निर्माण करावयाचा याबाबत प्रात्यक्षिकासाठी प्राथमिक स्वरूपाचे प्रशिक्षणही यावेळी दिले .उदया प्रशिक्षणाचा अंतिम दिवस आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार,नगरपालिकेचे मुख्याधिकारी,नायब तहसीलदार नितीन धापसे -पाटील यांच्यासह संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!