*राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेतील गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी*
*मंत्री हसन मुश्रीफ यांची नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली भेट*
*कोल्हापूर, दि. २०:*
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांच्याकडे नोंदणी केली. जिल्हा परिषदेच्या नव्या सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट म्हणून ही नोंदणी करण्यात यावेळी. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गटनेते सुधीर देसाई, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शशिकांत खोत, मनोजभाऊ फराकटे आदी प्रमुख उपस्थित होते.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व म्हणजे वीस सदस्यांनी एकत्र येऊन ही नोंदणी केली. त्यामध्ये सौ. शिल्पा शशिकांत खोत, सौ. शैलजा सतीश पाटील, संग्रामसिंह भैय्यासाहेब कुपेकर, राजेंद्र गुंडाप्पा सूर्यवंशी, शिरीष हिंदुराव देसाई, अमरसिंह रामचंद्र चव्हाण, डॉ. जयंत प्रदीप पाटील, श्रीमती शोभाताई गणपतराव फराकटे, सुधीर राजाराम देसाई, शिवशंकर राजकुमार हत्तरगी, भगवानराव पंडितराव पाटील, सौ. पूजा दिलीप पाटील, सौ. रेखा प्रकाश मुगडे, सौ. विद्या विलास पाटील, क्रांतिसिंह संपतराव पवार -पाटील, सौ. राजकुंवर रणवीरसिंह गायकवाड, कु. अमृता अरुण डोंगळे, सौ. रचना राहुल गावडे, सौ. सुवर्णा रणजीत कांबळे, कु. मानसी कल्लाप्पा भोगण या सदस्यांचा समावेश आहे.
*गोरगरिबाला दैवत माना……!*
दरम्यान; नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यापूर्वी सर्व सदस्य कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात जमले. सर्वांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना खेड्यापाड्यात अगदी वाड्या वस्त्यांवर पोहोचवा. सर्व सामान्य विशेषता गोरगरीब माणूस दैवत म्हणून अंतरात्म्याच्या तळमळीतून काम करा….!
………..
*कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाची नोंदणी निवडून आलेल्या सर्व म्हणजे वीस सदस्यांनी जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांच्याकडे केली.*
============



