नृसिंहवाडीत दत्त नामाचा गजर
कोल्हापूर
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा दत्त नामाचा गजर, भाविकांची फुललेला परिसर आणि कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगम तीर्थावर तयार झालेल्या भक्तिमय वातावरणात नृसिंहवाडीत दत्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मार्गशीर्ष गुरुवार आणि दत्त जयंती दोन्ही एका दिवशी आल्याने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
दत्त जयंती निमित्त नृसिंहवाडीत सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे काकड आरती, सकाळी अभिषेक, दुपारी महापूजा आणि नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. सायंकाळी श्रींची उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामी मंदिरातून वाजत गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आली. जन्म काळासाठी चांदीचा पाळणा विविध फुलांनी आकर्षक सजवण्यात आला होता. उपस्थित भाविकांनी सजवलेल्या पाळण्यावर अबीर, गुलाल व फुलांचे मुक्तहस्ते उधळण केली. जयंतीला भाविकांची गर्दी झाली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या



