कनिष्ठ महाविद्यालय संच मान्यते मधील त्रुटी दूर करा ..
-जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सन 2025-26 च्या शिक्षक संघ मान्यता ऑनलाईन करण्यात येणार आहेत यामध्ये 20 वर्षा वरील विद्यार्थी ग्राह्य धरण्यात यावेत, एटीकेटी विद्यार्थी ग्राह्य धरण्यात यावेत तसेच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया फक्त महानगरा मध्ये राबवावी. या सह कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जाचक ठरणाऱ्या अटी रद्द कराव्या या मागण्यांचे निवेदन आज शिक्षण उपसंचालक मा कोळेकर मॅडम यांना सादर करून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनामध्ये प्रस्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. शिवाजीराव होडगे यांनी केले. प्रा. प्रशांत मेधावी यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या मांडल्या. यावेळी शाळा कृती समितीचे बाबा पाटील, DCPS संघटनेचे प्रा करणसिंह गायकवाड यांनी सम्योचीत * भाषणे केली, तसेच संघटनेचे अध्यक्ष प्रा. अभिजित दुर्गी यांनी संघटनेची भूमिका मांडली. यावेळी संघटनेचे सचिव प्रा संजय मोरे यांनी आंदोलन का करावे लागले, शासनाची संच मान्यते मधील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या कश्या वर्ग तुकड्यांच्या मुळावर घाव घालणाऱ्या आहेत यावर सखोल मार्गदर्शन केले . महासंघाचे माजी कार्याध्यक्ष प्रा अविनाश तळेकर यांनी मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभगावडे यांनी वर्तमान काळातील शिक्षकांच्या समोरील समस्या व त्याच्या संदर्भात मार्गदर्शन करून संघटनेला जाहीर पाठिंबा दिला यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रा.अभिजित दुर्गी, सरचिटणीस प्रा संजय मोरे, उपाध्यक्ष प्रा शिवाजीराव होडगे, प्रा. अमर चव्हाण, प्रा. कॅ. डॉ. अमित रेडेकर, प्रा. प्रशांत मेधावि, प्रा. व्ही टी कांबळे, प्रा. सुनील भोसले, प्रा. बी. के. मडीवाळ, प्रा. उपस्थित होते



