* ‘या शैक्षणिक वर्षापासून मुलांना इयत्ता अकरावी प्रवेश ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारेच मिळणार‘
* मुलांनी ऑफलाईन प्रवेश घेऊ नये.
दिनांक 6 मे 2025 च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2025- 26 पासून राज्यातील सर्व क्षेत्राकरिता अल्पसंख्यांक दर्जासह उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित कनिष्ठ महाविद्यालय याच्या मध्ये सर्व शाखा मधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित करताना पालकांनी शासन निर्णय प्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क भरणे बंधनकारक राहील तसेच प्रवेश निश्चित केले नंतर विषयांमध्ये बदल केल्यास सदर विषयासाठी शासन नियमाप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क अदा करावे लागेल.
शासनमान्य प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयास करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रत्येक प्रवेश फेरीदरम्यान शासन मान्यता प्रवेश क्षमतेनुसार शिल्लक प्रवेश क्षमता तपासून घ्यावी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये.
ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही.
*CBSE व ICSE या बोर्डाच्या उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये ऑन लाईन प्रवेश होणार नसून फक्त राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातच प्रवेश केले जाणार आहेत*
सर्व पालकांना विनंती करण्यात येते की, ऑफलाईन प्रवेश निश्चित करू नका. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रवेश होणार असल्याने ऑनलाईन प्रवेशासाठी कागदपत्रे तयार ठेवून वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन माहिती भरावी व इयत्ता ११ वी प्रवेश घ्यावा. असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.
previous post