शिक्षणशास्त्र अधिविभागात दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन
कोल्हापूर दि २८ : शिवाजी विद्यापीठातील शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या वतीने दि. ५ व ६ दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. “एम्ब्रेसिंग डायव्हर्सिटी: रीइमेजिनिंग इन्क्लुसिव एज्युकेशन इन अ ग्लोबलाइज्ड वर्ल्ड” हा मुख्य विषय आहे.
परिसंवादाचे उदघाटन गुरुवारी दि. ५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठातील शिक्षणशास्त्र सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठातील प्रभारी प्र.कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव, प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे व प्रमुख उपस्थिती आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.अजय साळी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी यांनी परिसंवादात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. चेतना प्र. सोनकांबळे व समन्वयक डॉ. विद्यानंद खंडागळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.





