गड आला, सिंह गेला.. मग फेटा कशाला ?
अजित पवारांना राजेश पाटील यांचा पराभव जिव्हारी
कोल्हापूर : चंदगडचा गड आला, पण आमचा सिंह गेला.. मग सत्काराचा फेटा कशाला ? असे म्ह्णत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागरी सत्कार असूनही फेटा बांधून घेण्यास नकार दिला. चंदगड विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांचा झालेला पराभव पवारांच्या जिव्हारी लागल्याचे आजच्या त्यांच्या दौऱ्यात दिसले. यामुळे राष्ट्रवादी पक्षाला ताकद देण्यासाठी राजेश पाटील यांचे राजकीय पुनर्वसन ते कसे करणार याची उत्सुकता लागली आहे.
पवार उपमुख्यमंत्री झाल्याने चंदगड विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी पक्ष व माजी आमदार राजेश पाटील प्रेमी कार्यकर्ते यांच्याकडून त्यांचा अडकूर येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पवारांनी फेटा बांधून घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील यांच्या मतदारसंघासाठी आपण भरभरुन निधी दिला. 1600 कोटी रुपयांची विकासकामे मतदारसंघात झाली. मात्र, येथील नागरिकांना राजेश पाटील यांचा पराभव केला. जिल्ह्यात महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आले, पण राजेश पाटील पराभूत झाले. गड आला पण सिंह गेला. राजेश पाटील यांचा पराभव झाला याची खंत वाटते. नरसिंग गुरुनाथ यांना एकदा 11 मतांनी निवडून दिलं, काय अजब लोकं आहेत राव, असेही अजित पवार म्हणाले. जिल्ह्यात महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आले पण आमचे राजेश पाटील हे निवडून आले नाहीत. म्हणजे गड आला पण आमचा सिंह गेला, याचं मला खूप दुःख आहे मी आज कोल्हापुरी फेटा बांधून घेतला नाही, कारण माझा उजवा हात असलेला राजेश याठिकाणी पराभूत झाला आहे. राजेशला पुन्हा आमदार करा, तुम्ही म्हणाल तितके फेटे बांधून घेईन
विधानसभेत राजेश पाटील यांचा पराभव झाला, त्याचा संदर्भ देताना माजी आमदार राजेश पाटील यांना अश्रू अनावर झाले. बोलताना राजेश पाटील यांचा हुंदका दाटून आला,सर्व काही सुरळीत असताना माशी कुठं शिंकली हे मला माहीत नाही. पण, ही जनता कायम आपल्यासोबत राहिलं. अजित दादांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेलं पाहिल्याशिवाय आपण वाढदिवस साजरा करणार नाही. माझे डोळे मिटण्याच्या आधी मला अजित दादांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेलं पाहायचं आहे, असं देखील राजेश पाटील म्हणाले.
राजेश पाटील यांचा पराभव झाला याची खंत वाटते. नरसिंग गुरुनाथ यांना एकदा 11 मतांनी निवडून दिलं, काय अजब लोकं आहेत राव, असेही अजित पवार म्हणाले. जिल्ह्यात महायुतीचे सगळे उमेदवार निवडून आले पण आमचे राजेश पाटील हे निवडून आले नाहीत. म्हणजे गड आला पण आमचा सिंह गेला, याचं मला खूप दुःख आहे, अशा शब्दात अजित पवारांनी राजेश पाटील यांच्या पराभवाची खंत बोलून दाखवली.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आपल्या भाषणात अजित पवार यांनी फेटा बांधून का घेतला नाही याचा उल्लेख केला.चंदगड विधानसभा मतदारसंघात दादांनी प्रचंड निधी दिला होता. त्यामुळे राजेश पाटील निवडून येतील असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही.