आयटीआय मुरगूड व राधानगरी येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) योजनेअंतर्गत प्रशिक्षित उमेदवारांना तसेच इतर नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुरगुड यांच्या संयुक्त विद्यमाने 10 मार्च रोजी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने 11 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत “प्लेसमेंट ड्राईव्ह” चे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.
10 मार्च रोजी स्टिचर, सुपरवायझर, ऑपरेटर पदांसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुरगुड येथे अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) अंतर्गत प्रशिक्षीत उमेदवार हे 10 वी, 12 वी तसेच आयटीआय पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.
तर 11 मार्च रोजी इलेक्ट्रेशियन,वेर्ल्डर, इलेक्ट्रीकल ऑपरेटर पदांसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राधानगरी येथेही वरील पात्रता असणारे उमेदवार पात्र ठरणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदवावेत. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युम सोबत आणणे आवश्यक आहे.







