पोलिस कर्मचार्‍यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने बांधला स्नेहबंधाचा धागा, सलग १७ व्या वर्षी पार पडला रक्षाबंधन सोहळा*

Spread the news

*ऑन डयुटी २४ तास कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने बांधला स्नेहबंधाचा धागा, सलग १७ व्या वर्षी पार पडला रक्षाबंधन सोहळा*

जनसेवेसाठी सक्रीय असलेल्या आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राबणार्‍या, पोलिस कर्मचार्‍यांबद्दल स्नेह आणि कृतज्ञता म्हणून भागीरथी संस्थेच्यावतीने, रक्षाबंधनाचा सोहळा साजरा होतो. बर्‍याचदा पोलिस कर्मचार्‍यांना त्यांच्या कुटूंबियांसमवेत सण-उत्सव साजरे करता येत नाहीत. अशावेळी भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, गेली १७ वर्षे पोलिस रक्षाबंधन उपक्रम राबवला जात आहे. आज कोल्हापुरातील ५ पोलिस ठाण्यासह गांधीनगर पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांना, भागीरथी संस्थेच्या महिला सदस्यांनी स्नेहधागा बांधला. त्यानंतर दक्षता कमिटी सदस्यांची बैठक झाली.
भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून सौ. अरूंधती महाडिक यांनी ३६ हजार पेक्षा अधिक महिलांचे संघटन आणि सक्षमीकरण केले आहे. स्वयंरोजगार, स्वसंरक्षण, बचत गटांची उभारणी आणि महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासह, भागीरथी संस्था समाजोपयोगी विविध उपक्रम राबवते. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांवर कामाचा ताण वाढतो आहे. बर्‍याचदा पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना कुटुंबियांसमवेत सण-उत्सव साजरे करता येत नाहीत. अशा परिस्थितीत भागीरथी संस्थेच्यावतीने गेल्या १७ वर्षापासून पोलिसांसाठी रक्षाबंधन उपक्रमाचे आयोजन केले जाते. जुना राजवाडा, लक्ष्मीपूरी, शाहुपूरी, राजारामपूरी, करवीर आणि गांधीनगर पोलिस ठाण्यात यंदा रक्षाबंधनाचा उपक्रम राबवण्यात आला. जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांचे ऐश्‍वर्या देसाई, अश्विनी वास्कर, सरीता हारुगले, गिता काटवे, रोहिणी मेथे, स्नेहा केनभावी, राधा मेस्त्री, रेखा केसरकर, सरोज फडके, संगीता सातपुते यांनी औक्षण केले आणि त्यांना राखी बांधली. तर देवस्थान समितीच्या माजी सदस्या संगीता खाडे, शरयु भोसले, पूजा सन्नके, अश्‍विनी पंडत, राजेश्वरी मोटे, रंजना शिर्के, अर्चना मेढे, शारदा पोटे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राखीचा धागा बांधला. लक्ष्मीपूरी पोलिस ठाण्यात, शिवानी पाटील, चांदणी कांबळे, ज्योती धावारे, माधुरी शिंदे, अश्‍विनी पाटील, राधिका पाटील यांनी राखी बांधून, कर्मचार्‍यांचे औक्षण केले. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड, हवालदार एकनाथ कळंत्रे यांच्या उपस्थितीत लक्ष्मीपूरी पोलिस ठाण्यात दक्षता कमिटीची बैठक झाली. राजारामपूरी पोलिस ठाण्यातही भागीरथी संस्थेच्या भाग्यश्री शितोळे, सिमा पालकर, स्मिता चव्हाण, रंजना रणवरे, शितल तिरूखे, राणी खर्पे, स्मिता चव्हाण यांनी पोलिसांना राखी बांधून, स्नेह जपला. करवीर पोलिस ठाण्यात भागीरथी संस्थेच्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक झाले. यावेळी सुनिता कोळी, रंजना येडगे, श्‍वेता कदम, रूपाली कुंभार, शोभा कोळी, सुषमा पाटील, सविता कोळी यांनी पोलिस कर्मचार्‍यांना राखी बांधून, कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान गांधीनगर पोलीस ठाण्यातही भागीरथीच्या महिला सदस्यांनी रक्षाबंधनाचे पवित्र नाते प्रस्थापित केले. सुलोचना नार्वेकर, हेमलता माने, वनिता खत्री, रूपा काळे, चिगूताई तहसीलदार, पद्मा सावंत, विद्या माळी, चांदणी पिंजारी, शिल्पा पाटील, पूजा कांबळे, भाग्यश्री साळुंखे यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांना राखी बांधली. यावेळी कामानिमित्त गांधीनगरमध्ये आलेल्या कर्नाटक राज्यातील दोन पोलिस कर्मचार्‍यांनाही राखी बांधण्यात आली. त्यामुळे ते कर्मचारी सुध्दा भारावून गेले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!