प्रल्हाद चव्हाण यांची निष्ठा आदर्शवत
शाहू महाराज यांचे गौरवौद्गार, गुरुबाळ माळी लिखित पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर
माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांनी आयुष्यभर जी निष्ठा दाखविली, ती समाजाला प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे, असे गौरवौद्गार खासदार शाहू महाराज यांनी काढले.
माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या व्दितीय स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार शाहू महाराज बोलत होते. प्रल्हाद चव्हाण यांच्या जीवनचरित्रावर पत्रकार गुरुबाळ माळी यांनी लिहिलेल्या ‘निष्ठावंत’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्ह्णून आमदार सतेज पाटील व ऑल इंडिया टेंट डकोरेटर्स असो. चे अध्यक्ष दडू पुरोहित हे उपस्थित होते. यावेळी महंमद शेरीफ शेख व शकुंतला कांबळे यांना निष्ठावान कार्यकर्ता पुरस्कार तर शहाजी चव्हाण, पांडूरंग करपे व शंकर माळी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
खासदार शाहू महाराज म्ह्णाले, चव्हाण यांनी आयुष्यभर काँग्रेसवर पक्षावर निष्ठा ठेवली. व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी जपली. त्यांना आमदार व्हायचे होते. पण, आयुष्यभर फुटबॉल खेळाप्रमाणे त्यांना गोल करण्याऐवजी पास देण्याची वेळ आली. त्यांनी चांगले पास दिल्याने अनेकांनी आमदारकीचा गोल केला.
आमदार सतेज पाटील म्ह्णाले, प्रल्हाद चव्हाण यांचे कार्य आणि निष्ठा हे आदर्शवत आहे. स्वार्थी राजकारणाच्या युगात एकनिष्ठ कसे रहावे हे प्रल्हाद चव्हाण यांच्याकडून शिकायला हवे. त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र सागर चव्हाण व सचिन चव्हाण हे जपत आहेत, हे कौतुकास्पद आहे.
प्रारंभी माजी उपमहापौर विक्रम जरग यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी उपमहापौर भूपाल शेटे, दडू पुरोहित, प्रफुल्ल जोशी, वसंत लिंगनूरकर, महमंद शेरीफ शेख यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास माजी महापौर सागर चव्हाण, आर.के. पोवार, महादेवराव आडगुळे, मारूतराव कातवरे, माजी उपमहापौर संजय मोहिते, बी.के. डोंगळे, ऑल महाराष्ट्र टेंट, डकोरेटर्स असो. चे उपाध्यक्ष राहूल मनोत, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे चेअरमन सुनील माळी, मावळचे राज्य प्रतिनिधी नितीन गवळी, सातारा राज्य प्रतिनिधी गोरखनाथ करपे, कोल्हापूर जिल्हा मंडप व डेकोरेटर्स असोसिएशनचे शहराध्यक्ष विनायक सूर्यवंशी उपाध्यक्ष तुकाराम पाटील सचिव सुनील होनागडे सहसचिव मुसा शिकलगार सुर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, सरलाताई पाटील, डोंगळे, माजी नगरसेवक राहूल माने, भारती पवार, इश्वर परमार, इंद्रजित बोंद्रे, जयश्री चव्हाण, प्रवीण केसरकर शमा मुल्ला महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले मधुकर रामाणे, राजू साबळे, दुर्वास कदम, विजय सुर्यवंशी, राजाराम गायकवाड, सुभाष बुचडे,रवी आवळे, प्रकाश चौगले, उदय दुधाणे, शहर काँग्रेसचे सरचिटणीस संजय पोवार वाईकर मदन चोडणकर, नाना उलपे,आपचे संदीप देसाई, चंदा बेलेकर, अमर समर्थ, सुशिला चव्हाण, शुंभागी चव्हाण, डॉ. संदीप सोमनांचे ,रागिणी सोमनांचे, सुर्या चव्हाण, मल्हार चव्हाण, चंद्रकांत यादव, डॉ. संतोष निंबाळकर, डॉ. संगीता निंबाळकर, प्रविण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आभार मानले.