प्रेमाचं महत्त्व सांगणारी तुझ्याचसाठी..! कवितासंग्रहाचे एक जूनला प्रकाशन

Spread the news

 

प्रेमाचं महत्त्व सांगणारी तुझ्याचसाठी..!

कवितासंग्रहाचे एक जूनला प्रकाशन

    •  

कोल्हापूर : कवीता हा अंतरात्म्याचा आवाज असतो. कवी कवीतेतून बोलत असतो. वाचक कवितामय होवून वाचत असतो. याच वैशिष्ट्यावर प्रेम काय असतं. प्रेम कसं केलं पाहिजे, पती-पत्नीतील प्रेमाचा गोडवा कसा असावा, या सगळ्या प्रेमाच्या गोष्टी उलगडून सांगणारा कवीता संग्रह म्हणजे ‘तुझ्याचसाठी’..! या कवीता संग्रह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १ जून २०२५ रोजी कोल्हापुरातील हॉटेल वृषाली येथे संपन्न होत आहे. हा माझा पहिलाचं कवीता संग्रह असून नक्कीच महाराष्ट्रातील वाचकवर्गाला प्रेरणा देणारा ठरेल, अशी माहिती तुझ्याचसाठी कवीता संग्रह पुस्तकाच्या लेखिका-कवी जान्हवी किशोर माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लेखिका-कवी जान्हवी किशोर माने या गृहीणी आहेत. त्यांना लहानपणापासून वाचन-लिखाणाची आवड आहे. त्यांनी प्रेमाचं महत्त्व सांगणारी ‘तुझ्याचसाठी’ ही कवीता संग्रह पुस्तीका भाग्यश्री प्रकाशनाच्या माध्यमातून वाचकांसमोर आनली आहे. या पुस्तीकेचा प्रकाशनसोहळा १ जून रोजी हॉटेल वृषाली येथे सकाळी ११ वाजता होत आहे. खासदार धैर्यशील माने, महावीर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. गोपाल गावडे, ज्येष्ठ कवी साहित्यिक डॉ. चंद्रकांत पोतदार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य मंडळाचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे, सारथी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. संभाजी खोत, मणेर हायस्कूल इचलकरंजीच्या मुखाध्यापिका वैशाली कुलकर्णी, वरीष्ठ पत्रकार एकनाथ पाटील आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कवीता संग्रह पुस्तीकेची प्रस्तावणा यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णीचे मराठी विभागप्रमुख, कवी साहित्यीक डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी दिली आहे.

कवी जान्हवी माने यांच्या कवीतेत कवितेचा कोणताही मापदंड न लावता केवळ कविता आस्वादाने हे उचित ठरेल अशी त्यांची प्रेम कवीता आहे. कवितेच्या उदंड वाटचालीत प्रेमाच्या विरहाच्या असंख आठवणींना घेऊन त्यांनी कवितेच्या प्रांतात पहिले पाऊल टाकले आहे. कवितेचा त्यांचा प्रवास खूप लांबवरचा असला तरी पहिले पाऊल टाकणे अधिक महत्त्वाचे असते. कवितेच्या प्रवासात या पुढील काळातही अधिक भक्कमपणे ही पावले पडतील, अशी अशादायकता या कवितेत आहे. सखोल चिंतन, सभोवतालचा अस्वस्थपणा आणि संवेदनशील नजर व सामाजिक भान त्यांच्या कवितेतून अधिक प्रगल्भ चिंतनशीलतेने साकारात आहे. पत्रकार परिषदेस किशोर माने,.सो. भाग्यश्री पाटील कासोटे आदी मान्यवर उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!