ब्रेल डे निमित्त आज नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड यांच्या नगाळा पार्क येथील ऑफिसमध्ये कार्यक्रम झाला. ब्रेल डे हा दिवस लुईस ब्रेल यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी जानेवारी महिन्यात साजरा केला जातो. लुईस ब्रेन यांनी दृष्टिहीन लोकांसाठी ब्रेल लिपीचा अविष्कार केला त्यामुळे त्यांना वाचन व लेखन शक्य झाले दृष्टिहीन लोकांच्या अधिकारासाठी व हक्कासाठी आणि त्यांच्या विकासासाठी जागृती निर्माण केली जाते. लुईस ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 रोजी फ्रान्समध्ये एका चाभाराच्या कुटुंबात झाला. त्यांनी 3 वर्षांच्या असताना एक दुर्घटनेत एक डोळा गमावला आणि नंतर दुसरा डोळाही गमावला. लुईस ब्रेल यांनी दृष्टिहीन लोकांसाठीच्या शाळेत शिक्षण घेतले. त्यांनी संगीत आणि शिक्षणामध्ये रुची दाखवली. लुईस ब्रेल यांनी 15 वर्षांच्या उमेदीत ब्रेल लिपीचा आविष्कार केला. ही लिपी दृष्टिहीन लोकांना वाचन आणि लेखन शक्य करते. लुईस ब्रेल यांनी दृष्टिहीन लोकांसाठी शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी ब्रेल लिपीचा प्रसार करण्यासाठी काम केले. लुईस ब्रेल यांचा मृत्यू 6 जानेवारी 1852 रोजी झाला. त्यांच्या आविष्कारामुळे दृष्टिहीन लोकांच्या जीवनात क्रांती झाली आहे.
या कार्यक्रमास डॉक्टर अंजली निगवेकर संगीत तज्ञ यांनी दृष्टिहीन विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीचा काय गरज आहे तर डोळस लोकांना जितक्या लवकर विषय समजू शकत नाही त्यापेक्षाही लवकर ब्रेल लिपीमुळे अंध लोक वाचू
ebnsh
शकतात, लिहू शकतात याबाबत त्यांनी माहिती दिली व प्रात्यक्षिक करून दाखवले. डॉक्टर गायत्री होशिंग यांनी अंध लोकांमध्ये दृष्टिक्षेप कसा चांगला असतो व त्यांना मेडिटेशन व योगा बद्दल माहिती दिली. सुरेश खांडेकर यांनी अब्दुल कलाम यांचे उदाहरण देऊन कशी दृष्टिहीन लोकांना प्रगती करावी याचे उदाहरणासह माहिती दिली.
प्रस्तावना डॉक्टर नमिता खोत यांनी केले. सूत्रसंचालन डॉक्टर निरंजना चव्हाण मॅडम यांनी केले. विजय रेडेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सुनील नगराळे यांनी अध्यक्षीय भाषण केले तर आभार प्रदर्शन शिवानंद पिसे यांनी केले. मिलिंद करंजकर, सचिन मेनन, जयश्री पिसे, अंध विद्यार्थी व देशभूषण शाळेचे मुख्याध्यापक गाठ सर हेही उपस्थित होते. अंध श्रेया चव्हाण व सई जाधव यांनी खेळामध्ये विशेष प्राधान मिळवल्याबद्दल त्यांचेही सत्कार कार्यक्रमात झाले.



