“प्रोजेक्ट महादेवा” अन… अभिनेते जॉकी श्रॉफ आणि आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट

Spread the news

“प्रोजेक्ट महादेवा” अन… अभिनेते जॉकी श्रॉफ आणि आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट

­

 

मुंबई दि.१२ : भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या इंडिया @४७ संकल्पनेतून भारताला महासत्ता होण्याच्या बरोबर खेळातही भारत देश अग्रेसर असावा. यासह महाराष्ट्र राज्यातील तळागाळातील फुटबॉल कौशल्याचा शोध घेवून त्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सी यांच्या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र शासनाच्या मित्र संस्थेने “प्रोजेक्ट महादेवा” या शासनाच्या महत्त्वाकांक्षी फुटबॉल उपक्रमाचा शुभारंभ केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार, मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतीय फुटबॉल खेळाडू सुनील छेत्री यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. महादेवा प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्रातील साठ मुलांना वेस्टन इंडिया फुटबॉल असोसिएशन ( WIFA ) यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेनिंग देण्यात येणार आहे. या महाराष्ट्र सरकारच्या फुटबॉल प्रोत्साहन उपक्रमाचे अधिकृत ब्रँड ॲम्बेसेडर बॉलीवूड म्हणून अभिनेता टायगर श्रॉफ यांची पुढील ५ वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. या उपक्रमाची माहिती घेवून आपला सहभाग या उपक्रमात नोंदविण्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांचे वडील प्रसिद्ध अभिनेते जॉकी श्रॉफ यांनी मित्र संस्थेच्या कार्यालयास सदीच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची त्यांनी आवर्जून भेट घेतली व शासनाचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी व निवड झालेल्या साठ मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी आपण स्वतः उपलब्ध राहू याची हमी दिली. राज्यातील फुटबॉल खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, फुटबॉल खेळास चालना मिळावी यासाठी मित्र संस्थेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या प्रोजेक्ट महादेवा या प्रकल्पास आपल्यासारख्या दिग्गजांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, आमदार सुमित वानखडे, नागपूरचे उद्योजक अंकुश रेवाडिया देखील उपस्थित होते.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!