पुणे पदवीधर मतदार संघाच्या समन्वयकपदी सुनील मोदी यांची नियुक्ती

Spread the news

 

 

 

  •  

पुणे पदवीधर मतदार संघाच्या समन्वयकपदी सुनील मोदी यांची नियुक्ती

पुणे | डिसेंबर 2026 मध्ये होणाऱ्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या तयारीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुरूवात केली आहे. या निवडणुकीसाठी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाने कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांची पुणे पदवीधर मतदार संघाच्या समन्वयकपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

सुनील मोदी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत माजी नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती व माजी परिवहन सभापती म्हणून काम पाहिले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर त्यांनी सलग 12 वर्षे व कार्यकारिणीवर 6 वर्षे जबाबदारी निभावली. तसेच 1995 मध्ये युती सरकार असताना पुणे म्हाडा मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

त्यांचा शैक्षणिक व राजकीय अनुभव लक्षात घेऊनच ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुणे पदवीधर मतदार संघातील पाचही जिल्ह्यांमध्ये पक्ष व सर्व अंगीकृत संघटनांच्या माध्यमातून अधिकाधिक पदवीधरांची मतदार नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!