राधानगरीतील निष्ठावंत म्हणाले, आमचं ठरलंय….काँग्रेस सोडायची न्हाय* *आमचा डीएनए काँग्रेसचा, काँग्रेस कधी सोडणार नाही* *राधानगरीतील पदाधिकाऱ्यांचा सतेज पाटील यांना शब्द

Spread the news

*राधानगरीतील निष्ठावंत म्हणाले, आमचं ठरलंय….काँग्रेस सोडायची न्हाय*
*आमचा डीएनए काँग्रेसचा, काँग्रेस कधी सोडणार नाही*
*राधानगरीतील पदाधिकाऱ्यांचा सतेज पाटील यांना शब्द :*

 

  •  

 

 

*कोल्हापूर :* राधानगरी तालुका हा पहिल्यापासून काँग्रेसची विचारधारा जपणारा तालुका आहे. याच विचारधारेने या तालुक्यातील जनता एकनिष्ठतेला नेहमी प्राधान्य देत आली आहे. आमचा डीएनए काँग्रेसचा असून काँग्रेस कधीच सोडणार नाही असा शब्द देत पक्षातच ठाम राहण्याचा निर्धार राधानगरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केला. या पदाधिकाऱ्यांनी खासदार शाहू छत्रपती व काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा संकल्प केला. तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेत काँग्रेससोबत राहण्याची ग्वाही दिली. काँग्रेसची विचारधारा एकसंघपणे राधानगरी तालुक्यात पुढे नेण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असा निर्धार या सर्वांनी व्यक्त केला. यावेळी सतेज पाटील यांनी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देणे ही माझी जबाबदारी आहे. असे निष्ठावंत कार्यकर्तेच पक्षाची खरी मुलुख मैदानी तोफ आहेत. त्यामुळे पुढच्या काळात निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काँग्रेसचा विचार अधिक बुलंद करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन या शब्दांत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. यावेळी राधानगरी तालुका काँगेसचे तालुकाध्यक्ष भोगावतीचे जेष्ठ संचालक हिंदुराव चौगले यांनी राधानगरी तालुक्यातील निष्ठावंत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आगामी सर्व निवडणूकांमध्ये खासदार शाहू छत्रपती व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या जोमाने काम करतील असे सांगितले.

यावेळी गोकुळ दुध संघाचे संचालक अभिजित तायशेटे, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, काँग्रेसचे समन्वयक सुशिल पाटील, भोगावतीचे माजी संचालक ए.डी.पाटील, गुडाळ संजयसिंह पाटील तारळे, सुधाकर साळोखे, अशोक साळोखे, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदीगरे, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाजीराव चौगले, मोहन धुंदरे, लहू कुसाळे यांनी खासदार शाहू छत्रपती व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी प्रामाणिकपणे काम करुया असा निर्धार व्यक्त केला.

यावेळी तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले, ए. डी. पाटील- गुडाळकर, काँग्रेसचे निरीक्षक भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, संजयसिंह पाटील, गोकुळ संचालक राजेंद्र मोरे, अभिजीत तायशेटे, भोगावतीचे संचालक रविंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य पांडुरंग भांदिगरे, राजाराम साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळोखे, काँग्रेसचे समन्वयक सुशिल पाटील- कौलवकर, एम.डी. देसाई, भोगावती शिक्षण मंडळाचे संचालक बाजीराव चौगले, मोहन धुंदरे, सुनील हिंदुराव चौगले, राजेंद्र यादव, संजय कांबळे, शंकर फराक्टे, साताप्पा खाडे, जयवंत पाडळकर, शिवाजी आदमापुरे, गणेश पाटील, तानाजी चव्हाण, आनंदा पाटील, विलास पाटील, साताप्पा मगदूम, राजेंद्र पाटील, सुनील कांबळे, नेताजी वाघरे, बी. डी. चौगले, चंद्रकांत चौगले, ब्रह्मदेव चौगले, ज्ञानदेव पाटील, संजय माळकर, रमेश पाटील, लहू कुसाळे, रोशन पाटील, बाळासो कोरजकर, विलास पाटील, मारुती भिसे, बापूसो पाटील, अशोक साळुंखे, संजय पाटील, मारुती पवार, एल. एस. पाटील, आनंदा फडके, दगडू चौगले, रंगराव गुरव, लक्ष्मण गोते, मधुकर रामाणे, वैभव तहसिलदार, संदीप डवर, शिवाजी पाटील, धर्मा कांबळे आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!