राजश्री पाटील : अर्थसाह्याने व्यक्तींना व्यवसायाभिमुख करा, पतसंस्थांना आवाहन

Spread the news

आर्थिक परिस्थितीपेक्षा अशा व्यक्तींना अर्थसाह्य करुन त्यांना व्यवसायाभिमुख बनवत त्यांची पत निर्माण करण्याचे काम पतसंस्थांनी करावे, गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या अध्यक्षा राजश्री पाटील

­

 

राज्याच्या ग्रामीण भागाचा आर्थिक कणा अजुनही पतसंस्थांवर आहे. आता पतसंस्थांची जबाबदारी वाढली असून, बेरोजगारांना व्यवसायाभिमुख बनवण्यासाठी आणि त्यांची पत निर्माण करण्यासाठी पतसंस्थांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी व्यक्त केले. कोल्हापुरातील आनंद भवन हॉलमध्ये झालेल्या पतसंस्था फेडरेशनच्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था फेडरेशनच्यावतीने, राज्यभरातील सहकारी पतसंस्थांच्या महिला मेळाव्याचे आज आयोजन केले होते. त्याला महापौर रुपाराणी निकम, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक, वैष्णवी महाडिक, सुरेखा लवांडे, भारती मुथ्था, निलीमा बावणे, ऍड. अंजली पाटील, राजश्री पाटील यांची उपस्थिती होती. सहकार सम्राज्ञी स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांसाठी काही स्पॉट गेम घेण्यात आले. तर समाजकारण आणि राजकारणाच्या बरोबरीने, महाडिक परिवाराने महिला सक्षमीकरणासाठी केलेले काम अतुलनीय असल्याचे मत गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी व्यक्त केले. पतसंस्थांनी केवळ ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे, या पलीकडे जाऊन, महिला बचत गटांना सक्षम बनवणे आवश्यक असल्याचे सांगितले. काही मायक्रो फायनान्स कंपन्यांमुळे महिला कर्जाच्या विळख्यात सापडतात. अशावेळी पतसंस्थांनी महिला बचत गट सक्षम करण्यासाठी आणि त्या महिलांचे कुटुंब टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून द्यावी, असे पाटील यांनी सांगितले. बचत गटांनीसुध्दा बाजारपेठेचा अंदाज घेऊन नवनव्या वस्तूंची निर्मिती करण्याचे आवाहन राजश्री पाटील यांनी केले. दरम्यान सहकार सम्राज्ञी या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. त्यामध्ये अंतिम फेरीत पोचलेल्या महिलांनी आपल्या क्रीडा कौशल्याचे सादरीकरण केले. तसेच आत्मविश्‍वास, प्रसंगावधान, सामान्य ज्ञान यांचीही चाचणी घेण्यात आली. यावेळी महिला आणि बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेविका माधुरी नकाते, रेखा उगवे, दीपा ठाणेकर, माधुरी व्हटकर, अर्चना कोराणे, जिल्हा परिषद सदस्या स्नेहल वेल्हाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!