नागरी सुविधांबाबत कोल्हापूर नेक्स्ट चे महापौरांना निवेदन

Spread the news

नागरी सुविधांबाबत कोल्हापूर नेक्स्ट चे महापौरांना निवेदन

­

 

को. दि.२५ : कोल्हापूर शहरातील नागरी सुविधांच्या समस्यांबाबत आज कोल्हापूर नेक्स्ट सदस्यांनी नूतन महापौर रूपाराणी निकम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
कोल्हापूर शहरातील नागरी समस्यांबाबत गेली दोन वर्षे कोल्हापूर नेक्स्ट च्या माध्यमातून विधायक प्रकारे काम सुरू आहे. महानगरपालिकेच्या विविध खात्यांच्या प्रमुखांसोबत बैठका करून समस्यांवर तोडगा काढण्याबाबत कोल्हापूर नेक्स्ट आग्रही आहे. संघटनेच्या पाठपुरामुळे अनेक नागरी सुविधांवर समस्या निघाल्या परंतु अजूनही काही समस्यांवर उपाययोजना झालेली नाही. त्याकडे नूतन महापौरांचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर नेक्स्ट चे सदस्य आज त्यांना भेटले.
कोल्हापूरच्या नूतन महापौर झाल्याबद्दल त्यांचा प्रथम सत्कार करण्यात आला. त्यानंतर निमंत्रक चंद्रकांत चव्हाण, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, प्रदीप उलपे, यशवंत माने, वंदना पुसाळकर, ओंकार गोसावी यांनी यापूर्वी महानगरपालिकेला दिलेल्या निवेदनांची माहिती महापौरांना करून दिली.
कमी कर्मचारी संख्या, शहर स्वच्छता, विस्कटलेली पाणीपुरवठा व्यवस्था, नगररचना विभागातील अधिकाऱ्यांचे बेकायदेशीर व न्यायालयीन आदेश धुडकावून चाललेले वागणे, अतिक्रमण विभागाचा अकार्यक्षम कारभार, इस्टेट विभागाकडील महानगरपालिकेचे गाळे व सभागृहे यातून थांबलेले उत्पन्न, घराफाळ्याचे अत्यंत संथ गतीने चाललेले पुनर्सर्वेक्षण या आणि अशा विविध विषयांवर सदस्यांनी मतप्रदर्शन केले.
महापौरांनी सर्व विषय ऐकून घेऊन दिलेल्या निवेदनांचा महापौर कार्यालयामार्फत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. यावेळी प्रसाद पाटोळे, अमित टिकले, डॉ. अनिकेत कुलकर्णी, शेफाली मेहता अनिल पोवार, मालती शिंदे आदि उपस्थित होते.

  •  

प्रति,
मा, संपादकसो
दै.
कृपया प्रसिद्धीसाठी,


Spread the news

You may also like

error: Content is protected !!