ऋतुराज पाटील यांच्यावर* *वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षाव*

Spread the news

*ऋतुराज पाटील यांच्यावर*
*वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षाव*

 

  •  

 

 

कोल्हापूर / प्रतिनिधी
डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यासह राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. यशवंत निवास आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, साळोखेनगर येथे ऋतुराज पाटील याना शुभेच्छा देण्यासाठी आजी- माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, हितचिंतक व विविध क्षेत्रातील मान्यवर यांची मोठी गर्दी झाली होती.

ऋतुराज पाटील यांनी सकाळी डी वाय पाटील ग्रुपचे संस्थापक, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादासाहेब यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण करून निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील समुहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, सौ. वैजयंती संजय पाटील, आमदार सतेज डी. पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज संजय पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील, देवश्री सतेज पाटील, अर्जुन व आर्यमन पाटील आदी उपस्थित होते.

सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत कसबा बावड्यातील यशवंत निवासस्थानी तर सायंकाळी 6 ते 10 या कलावधीत साळोखेनगर येथील डी. वाय पाटील कॉलेज येथे पाटील यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, क्रीडा, पत्रकारिता, प्रशासन अशा विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण,महिला आणि नागरिकांनी ऋतुराज पाटील यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

माजी आमदार राजीव किसनराव आवळे, के. पी. पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, गोशिमा चेअरमन दीपक चोरगे, मौनी विद्यापीठ चेअरमन मधुकर देसाई, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, विजय देवणे, आर. के. पोवार, सुनील मोदी, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील आबाजी, अरुण डोंगळे, करणसिंह गायकवाड, अजित नरके,बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगुले, एस आर पाटील, राजेंद्र मोरे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, प्रा. सुनील शिंत्रे, राहुल खंजिरे, शशिकांत खवरे, सत्यजित दि. जाधव, दौलत देसाई, स्थायी समिती माजी सभापती राजू लाटकर, भूपाल शेटे, संजय मोहिते, अर्जुन माने, इंद्रजीत बोंद्रे, राहुल माने, मधुकर रामाणे, दुर्वास कदम, संदीप नेजदार, प्रताप जाधव सरकार, यांच्यासह विविध माजी नगरसेवक, वसंतराव मुळीक, आर. एस. कांबळे, मानसिंग बोंद्रे, मंजित माने, विराज पाटील, राजवीर नरके, भारत पाटील भूयेकर, सुयोग मगदूम, विविध सहकारी कारखाने व संस्थांचे संचालक, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, छत्रपती संभाजीराजे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, गृहराज्यमंत्री योगेश कदम, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार वर्षा गायकवाड, विशाल पाटील, आमदार भाई जगताप, ज्योती एकनाथ गायकवाड, एकनाथ खडसे, सत्यजित तांबे, विश्वजीत कदम, माजी आमदार धीरज देशमुख, विक्रम सावंत, राजूबाबा आवळे, दत्त कारखाना चेअरमन गणपतराव पाटील, सौरभ राजू शेट्टी यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.

तरुणांचे आयकॉन असणाऱ्या आमदार ऋतुराज पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या युवा पिढीच्या उत्साह ओसंडून वाहत होता. शुभेच्छा देत त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरूणाई झुंबड उडाली होती. जनतेच्या सेवेला सदैव तत्पर असणाऱ्या या नम्र व विनयशील नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी ग्रामीण भागातूनही मोठी गर्दी झाली होती.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!