*रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर तर्फे “रास दांडिया” कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर :
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर या सामाजिक संस्थेतर्फे मंगळवार दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी “रास दांडिया” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत लोटस बॅंक्वेट हॉल, मार्केट यार्ड येथे पार पडणार आहे.
कोल्हापूरकरांना या पारंपरिक पण नाविन्यपूर्ण दांडिया रासाचा आस्वाद घेता येणार असून, पारंपरिक दांडिया रासासोबत सांस्कृतिक कार्यक्रम, नवनवीन खाद्यपदार्थांची स्टॉल्स आणि मनोरंजनाचे कार्यक्रम यांचा समावेश करण्यात आला आहे. विविध विभागांसाठी १,७५००० रुपयांपर्यंत आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका तेजू कोंडूसकर करतील, तर शरद शाह यांचा मेलडी ऑर्केस्ट्रा रसिकांचे मनोरंजन करणार आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर नवरात्रीचे औचित्य साधून सामाजिक एकता आणि सांस्कृतिक वारसा जोपासण्याबरोबरच “Unite for Good” या वर्षीच्या रोटरीच्या संकल्पनेवर आधारित सेवा उपक्रमही राबवत आहे. या निमित्ताने गरजू रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ५०,००० रुपयांपर्यंतची मदत केली जाणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक फेरोफेक्स, एस. एस. रिटेल आणि एव्हरेस्ट प्लाय असून, साई सर्व्हिस उपप्रायोजक म्हणून सहकार्य करत आहे. तसेच चिपडे सराफ, वामाज साडी, किचन प्लस, महेंद्र ज्वेलर्स, कॅफे मेव्हरीक, डॉ. रेश्मा चरणे, श्री. श्याम नोतानी, श्री. प्रताप कोंडेकर हे सहप्रायोजक आहेत.
या भव्य कार्यक्रमाचे उदघाटन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७० चे प्रांतपाल इंजि. अरुण डी. भंडारे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सह प्रांतपाल रो.हर्षवर्धन तायवाडे पाटील यांची उपस्थिती ही लाभणार आहे.
कार्यक्रमाबाबत माहिती देताना प्रेसिडेंट श्री. प्रदीप कारंडे यांनी सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहन केले. तसेच इव्हेंट चेअर जयेश गांधी व शरद तोतला यांनी अधिक माहितीसाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरशी संपर्क साधावा असे सांगितले.
या वेळी सेक्रेटरी नीलेश कुत्ते, क्लब सर्व्हिस डायरेक्टर हर्षद ढाळे, अमित माटे, अजिंक्य कदम, प्रितेश कर्नावट, प्रदीप पासमल, धवल गाला, आमिष शाह, साहिल गांधी, अभिषेक झंवर, चींतन शाह, कुशल राठोड याबरोबरच क्लबचे बहुसंख्य रोटेरियन्स उपस्थित होते.