राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने तीन एप्रिल ला कोल्हापुरात होणार सहकार समृद्धी पुरस्कार सोहळा, कार्यशाळा

Spread the news

राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने तीन एप्रिल ला कोल्हापुरात होणार सहकार समृद्धी पुरस्कार सोहळा, कार्यशाळा

­

 

कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने एका अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त, हा कार्यक्रम होणार आहे. सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्याा, तसंच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या यशस्वी महिलांच्या सन्मानाचा हा भव्य सोहळा असणार आहे. दिनांक 3 एप्रिल रोजी कोल्हापुरात सहकार सम्राज्ञी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यातून महकार चळवळीत कार्यरत असलेल्या महिलांना, प्रोत्साहन देण्यासह, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन सौ अरुंधती महाडिक यांनी पत्रकार बैठकीत दिली.

  •  

आजही सहकार क्षेत्राने महाराष्ट्राची मोठी प्रगती केली आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात सहकार चळवळीने आर्थिक कणा मजबूत केला आहे. अशावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन महिला सबलीकरण समितीने, सहकार सम्राज्ञी या पुरस्कार सोहळ्यातून आणखी एक भक्कम व्यासपीठ निर्माण केले आहे. सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी दिला जाणारा हा किताब, नक्कीच महिलांच्या गुणवत्तापूर्वक कार्याचा उचित सन्मान असेल. या अंतर्गत बेस्ट चेअरमन, बेस्ट सीईओ, बेस्ट विशेष विक्री अधिकारी असे पुरस्कार प्रदान केले जातील. सहकार साम्राज्ञी किताबा अंतर्गत प्रथम क्रमांकासाठी 21000 रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाईल तर द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार रूपये आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांक विजेत्या महिलेला 11 हजार रुपये आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. 3 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या बरोबरीने एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने सहकार कायद्यातील अपेक्षित बदल या विषयावर विशेष चर्चासत्र होणार आहे. त्याच्या बरोबरीने व्यवसायासाठी निधी कसा उभारावा, प्रभावी मार्केटिंग कसे करावे, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवावा, गुणवत्ता राखून पॅकेजिंग किंवा जाहिरात कशी करावी अशा विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिर आणि पुरस्कार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित केले आहेत. 3 एप्रिल रोजी, कोल्हापुरातील आनंद भवन, सायबर कॉलेज सभागृह या ठिकाणी हा कार्यक्रमम आयोजित केला आहे. त्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून, 78 88 28 12 51 किंवा 9822 26 98 13 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मार्फत करण्यात आले आहे.
यावेळी सागर चौगुले जवाहर छाबडा मोहन नवले उपस्थित होते


Spread the news

You may also like

error: Content is protected !!