संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १३वा वर्धापन दिन नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी संपण
न्यूज 18 लोकमतचे वरिष्ठ वृत्तनिवेदक विलास बडे यांची प्रमुख उपस्थिती
चौकटीत : पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था “संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे कोल्हापूर” असे गौरवोद्गार विलास बडे यांनी काढले
कोल्हापूर – संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १३वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इन्स्टिट्यूटच्या ग्रीन कॅम्पस मध्ये वृक्षारोपण व दीपप्रज्वलनाने झाली.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज18 लोकमतचे सीनियर वरिष्ठ वृत्तनिवेदक विलास बडे, सिंजेंटा इंडिया प्रा.लि. संचालक डॉ. माधवानंद काशीद, कंट्री लीड प्रा.लि चे संचालक श्रीधर लाढाणे, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी , सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विलास बडे यांनी आत्मनिर्भरतेचे महत्त्व अधोरेखित करत, “विद्यार्थ्यांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून ध्येय गाठावे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी दिलेली शिक्षणाची संधी ही समतेची ओळख आहे. कोल्हापूरचे विचार, संस्कृती, आणि प्रेम हे जगाला दिशा देणारे आहे,” असे प्रतिपादन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःची आवड आणि उद्दिष्ट ठरवून त्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात माधवानंद काशीद यांनी “एआय आणि शिक्षण” या विषयावर शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले. शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा संगम हा भविष्यासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विनायक भोसले यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत, विविध विभागांनी मिळवलेले शंभर टक्के निकाल, स्टाफची मेहनत व नियोजनबद्ध कार्यक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी शिक्षणासोबतच मूल्यशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विराट गिरी यांनी करताना संस्थेच्या 13 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी आजी-माजी सर्व स्टाफच्या सहकार्याचे व योगदानाचे कौतुक करत संस्थेने देशासाठी सक्षम अभियंते घडवण्याचे कार्य केले असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रणजीत शिरोडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. एन. एस. सासणे यांनी मानले.
कार्यक्रमाला संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.