सतेज कृषी प्रदर्शनाला शानदार प्रारंभ,सतेज कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक माजी खासदार राजू शेट्टी यांचे उदगार*

Spread the news

*सतेज कृषी प्रदर्शनाला शानदार प्रारंभ,सतेज कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक माजी खासदार राजू शेट्टी यांचे उदगार*

­

 

 

  •  

*गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक रेकॉर्ड करणारी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी गावची तीन फुटाची राधा म्हैस सतेज कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण*

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त व मार्गदर्शक माहिती मिळत असल्याचे उद्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढले. आज सतेज कृषी प्रदर्शनाला प्रारंभ झाला त्यावेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
जागतिक तापमान वाढशेतीमध्ये बदल होत चाललेले आहेत काळानुरूप शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने शेतीमध्ये बदल करावेत याचे उपयुक्त ज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे.कृषी क्षेत्रामध्ये काय चाललय उद्योग शेती उद्योग प्रक्रियेमध्ये काय चाललंय त्याच्यानंतर बाजारपेठांची परिस्थिती काय आहे आणि शेतकऱ्यांनी आपापल्या शेतांमध्ये काही नवनवीन प्रयोग केले असतील सगळे एका ठिकाणी इथं शेतकऱ्यांना आणि लोकांना बघायला मिळणार आहे.शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी भर पडेल. पूर्वीसारखी शेती आता राहिलेली नसून नवीन तंत्रज्ञान रेन हार्वेस्टिंग उत्पादन खर्च कमी कसा करायचा उत्पादन कसे वाढवायचं येणाऱ्या काळात जागतिक तापमान वाढ आणि वातावरणातील बदल झालेले आहेत त्यावर कशा उपाययोजना करायच्या याचे ज्ञान मार्गदर्शन सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे.असे राजू शेट्टी यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी शेतकरी हा देशाचा कणा आहे शेतकऱ्यांसाठी काय करता येईल या विचाराने प्रदर्शनाची सुरुवात सात वर्षांपूर्वी आमदार सतेज पाटील यांनी कृषी प्रदर्शनाचा निर्णय घेतला आणि आज मोठ्या प्रमाणात व्याप्ती वाढली आहे या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून दहा कोटींच्या आसपास उलाढाल होते आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीचे साहित्य या ठिकाणी खरेदी करतात प्रशासनाला सोबत घेऊन शेतकऱ्यांपर्यंत चांगली माहिती देण्याचा प्रयत्न कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून केला जातो येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आणखी काही करण्यासाठीचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन २०२५ आजपासून सुरू झाले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनास सुरुवात झाली यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क उपप्रमुख विजय देवणे गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे, आमदार जयंत आसगावकर,माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, सचिन चव्हाण, मधुकर रामाने, ईश्वर परमार, गोकुळ संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील चुयेकर, बाजार समिती बाजार समिती माजी सचिव मोहन सालपे,कळंबा सरपंच सुमन गुरव, जिल्हा परिषद माजी सदस्य शशिकांत खोत, किसन कल्याणकर, पल्लवी बोळाईकर, बाबासाहेब सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

*राधा म्हैस कृषी प्रदर्शनाचे आकर्षण*

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक रेकॉर्ड करणारी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी गावची तीन फुटाची राधा म्हैस सतेज कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. अनिकेत त्रिंबक बोराटे यांची ही म्हैस असून १९ जून २०२२ रोजी तिचा जन्म झाला आहे. आणि एक वर्षानंतर ती बुटकी असल्याचे लक्षात आले. जगात ही एकमेव गाय असल्याचे बोराटे यांनी सांगितले. तीन वर्षे वयाची दोन फूट आठ इंच ३१४ किलो वजन तेरा कृषी प्रदर्शनात सहभाग आणि सर्वत्र एक नंबरचे आकर्षण ही म्हैस ठरली आहे..२८ ऑक्टोबर २०२५ रोजी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शरद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. परभणी विटा येथे झालेल्या कृषी प्रदर्शनात तिने सहभाग घेतला आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने महा पशुधन एक्सपो भरविण्यात येणार आहे या प्रदर्शनात तिची निवड झाली आहे. राहुरी आणि परभणी विद्यापीठांमध्ये तिच्यावर संशोधन सुरू असून ही शेंगदाणा पेंड,चारा, मक्याचा भुसा, गव्हाचे पीठ गोळे खाते.

या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. याच बरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन,तांदूळ महोत्सव, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान,नवीन अद्ययावत मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.
या प्रदर्शनासाठी संयोजक विनोद पाटील,सुनील काटकर,धीरज पाटील, जयवंत जगताप सर कृषी विज्ञान केंद्र तळसंदे,जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगिरे,डॉ.सुनील कराड विभागीय संशोधन संचालक,नामदेवराव परीट, उपसंचालक कृषी विभाग, डॉ.प्रमोद बाबर पशु विभाग जिल्हा परिषद,नगरसेवक दुर्वासबापू कदम, कोल्हापूर,गोकुळचे हणमंत पाटील, डॉ.साळुंखे,युवराज पाटील तालुका कृषी अधिकारी, डी डी पाटील, महादेव नरके डी. वाय. पी.,स्काय स्टार इव्हेंट चे स्वप्नील सावंत आदींनी परिश्रम घेत आहेत.
प्रदर्शनाचे २०२५ हे ७ वे वर्ष असून या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, १५० पेक्षा अधिक पशु-पक्षांचा सहभाग, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल,लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश आहे. गोकुळ, महालक्ष्मी शेती विकास केंद्र शाहूपुरी, संजय घोडावत ग्रुप, चितळे डेअरी, यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे.त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग,आत्मा,पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद,पणन विभाग, कृषी विज्ञान केंद्र, यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खते कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत हे कार्यरत आहेत.

या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या कृषी क्षेत्रातील विविध संस्था सहभागी झाल्या आहेत. यामध्ये गोकुळ दूध संघ, जय इंडस्ट्रीज, मयुरेश टेकनॉलॉजी, गोविंद मिल्क सातारा, बिगमार्क इंडस्ट्रीज, फिनोलेक्स, समृद्धी प्लास्टिक,वरद इंडस्ट्रीज, सिद्धिविनायक ड्रीप इरिगेशन, वनिता ऍग्रो, शक्तिमान रोटर, कुबोटा ट्रॅक्टर, महिंद्रा, पाटील ऑईल मशीन,प्रथम पेस्ट,ओंकार बंब, रॉयल एनफिल्ड, EV बाईक & मोटर्स,, कागल बंब, पेरु नर्सरी स्टॉल, बळीराजा आटा चक्की, रोनिक, सागर ऑटोमोबाईल, आदी नामवंत कंपन्या आपले उत्पादन सोबत या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.
याचबरोबर विविध बी-बियाणे शेतीची अवजारे, खते औषधे आदी उत्पादने पहावयास मिळणार आहेत. शिवाय शेतीची नवीन माहिती व अन्य नवनवीन औजारे पहावयास मिळत आहेत.

याहीवर्षी तांदूळ महोत्सव भरविण्यात आला असून यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी तांदूळ,हळद,नाचणी शेतकऱ्यांकडून थेट उपलब्ध केले आहेत. त्याची विक्री होत आहे. तसेच प्रदर्शनात पाचट व्यवस्थापन ए आय तंत्रज्ञानचा वापर करून स्मार्ट शेती उपयोग, ड्रोनद्वारे फवारणी सेंसरचा वापर कृत्रिम रेतन ए.आय किटचा वापर याबाबत प्रदर्शनात मार्गदर्शन होणार आहे.
विविध प्रकारची फळे कडधान्ये पाहावयास मिळणार मिळत आहेत
या प्रदर्शनात विविध प्रकारचे जनावरे पशुपक्षी पहावयास मिळणार आहेत.तीन दिवस शेतीविषयक तज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.विविध सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत.तरी या प्रदर्शनास शेतकऱ्यांसह नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन आमदार सतेज पाटील आणि आयोजकांनी केले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!