न्यू कॉलेज सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. पी.डी. चौगले तर व्हा. चेअरमन श्री. एस. पी. माने यांची निवड
कोल्हापूर :
न्यू कॉलेज, सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर. या पतसंस्थेची संचालक मंडळ सभा शुकवार दिनांक. २७/०२/२०२६ रोजी झाली. या सभेमध्ये चेअरमनपदी श्री. पी. डी चौगले यांची तर व्हा. चेअरमनपदी श्री. एस. पी. माने यांची एकमताने निवड करणेत आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. ए. एस. हारुगले, सहाय्यक अधिकारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर हे होते. नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांच्या हस्ते माजी चेअरमन व व्हा. चेअरमन यांना पतसंस्थचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. चेअरमन यांनी संस्था वाढीसाठी व सभासदांना जास्ती जास्त सेवा देणे हे आपले प्रथम कार्य असेल असे मनोगत व्यक्त केले श्री. उमेश जाधव मा. व्हा. चेअरमन यांनी सर्व उपस्थिताचे आभार मानले आणि सभा संपल्याचे जाहीर केले.



