*इंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्सच्या*
*सदस्यपदी डॉ. अश्विनी जयंत काळे यांची निवड*7
डी. वाय. पाटील विद्यापीठाचा सन्मान
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी रिसर्चच्या स्टेम सेल अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन व मेडिकल बायोटेक्नॉलॉजी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अश्विनी जयंत काळे यांची इंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्स (INYAS) या प्रतिष्ठित राष्ट्रीय युवा विज्ञान अकादमीच्या २०२६ च्या सदस्यपदी निवड झाली आहे.
यंदा INYAS ने देशभरातून २४ नवीन सदस्यांची निवड केली असून, ही प्रक्रिया अत्यंत कठोर व स्पर्धात्मक होती. नवीन सदस्यांमध्ये आयआयटी, केंद्रीय व राज्य विद्यापीठे, राष्ट्रीय प्रयोगशाळा, सीएसआयआर आणि आयसीएआर संस्थांसह देशभरातील विविध संशोधन संस्थांचे प्रतिनिधित्व आहे. डॉ. काळे यांचा शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ही निवड करण्यात आली आहे.
INYAS ही राष्ट्रीय युवा विज्ञान अकादमी असून ती युवा वैज्ञानिकांना विज्ञान प्रसार, धोरणात्मक सहभाग, आंतरशाखीय संशोधन यासाठी संधी देते. नव्याने निवडलेले सदस्य देश व जगाच्या वैज्ञानिक प्राधान्यक्रमांना हातभार लावण्यासाठी उत्सुक आहेत.
डॉ. काळे यांना अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे आणि प्रा. डॉ. जयवंत गुंजकर यांचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले.
या निवडीबद्दल डॉ. काळे यांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, संशोधन संचालक प्रा. पी. एस. पाटील यांनी अभिंनदन केले,



