आत्मनिर्भर भारतासाठी भाजपा कोल्हापूरचा ‘स्वदेशीचा जागर’
कोल्हापूर दि. २४ माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वदेशी वस्तू वापरा असा संकल्प व्यापा-यां पर्यंत पोचवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने महाद्वार रोड परिसरातील व्यापाऱ्यांना आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवा याविषयात आवाहन आणि विनंती करण्यात आली. खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी महाद्वार परिसरातील दुकानांमध्ये जाऊन व्यापारांना प्रत्येक्ष भेटून स्वदेशी अभियानाचा संकल्प यशस्वी करण्याचे आवाहन केले. जीएसटी कपातीमुळे झाली मोठी बचत, प्रत्येक घरी स्वदेशी-घरोघरी स्वदेशी अशा आशयाचे फलक दुकान मालकांना दिले. त्याचबरोबर ग्राहकांना देखील स्वदेशी वस्तू खरेदी करण्याची विनंती करण्यात आली. भाजपा नेत्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, मोदिजींचा संकल्प यशस्वी करण्याची ग्वाही व्यापारांनी दिली.
याप्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, केंद्र सरकारने चार दिवसांपूर्वी घेतलेल्या जीएसटी कर कपातीच्या निर्णयामुळे यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव सर्व घटकांसाठी बचतोत्स्व ठरला आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. व्यापाऱ्यांनी स्वदेशी माल विक्री केल्याने आणि ग्राहकांनी स्वदेशी माल खरेदी केल्यामुळे आपली अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. मोदिजींचा स्वदेशीचा संकल्प व्यापारी ते थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी आजचा हा उपक्रम असल्याचे नमूद केले.
चौकट :- सर्वसामान्य मध्यमवर्गीय ग्राहकांच्यावर परदेशी बनावटीच्या ऑनलाईन वस्तू मागवण्याचा मोठ्या प्रमाणत ट्रेंड आहे त्यामुळे आता स्वदेशी वस्तू सुद्धा ऑनलाईन विकल्या जाव्यात यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
यावेळी राहुल चिकोडे, अशोक देसाई, विराज चिखलीकर, राजू मोरे, धनश्री तोडकर, हेमंत आराध्ये, विजय अग्रवाल, शैलेश पाटील, गिरीश साळोखे, विजय खाडे, डॉ राजवर्धन, संतोष भिवटे, राजसिंह शेळके, संगीता खाडे, गणेश देसाई, माधुरी नकाते, किरण नकाते, भरत काळे, हेमंत कांदेकर, अतुल चव्हाण, दिग्विजय कालेकर, विश्वजीत पवार, सयाजी आळवेकर, आशिष ढवळे, सुभाष रामुगडे, अमोल पालोजी, दिलीप पोवार, अवधूत भाटे, अभिषेक बोंद्रे, संतोष माळी, महेश यादव, अशोक लोहार, राहुल लायकर, बंकट सूर्यवंशी, प्रग्नेश हमलाई, धीरज पाटील, विशाल शिराळकर, रविकिरण गवळी, कोमल देसाई, राजगणेश पोळ, विनय खोपडे, रहीम सनदी, अनिल कामत, संगीता तांबे, आशिष कदम, अमेय भालकर, सतीश आंबर्डेकर, भूषण कोनकेकर, निरंजन घाडगे, सुजाता पाटील, सचिन पोवार, राजू जाधव, संग्राम जरग, दिलीप बोंद्रे, नजीर देसाई, गणेश चिले, रवींद्र घाडगे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.