शाहीर शहाजी माळी
यांना राजर्षी शाहू महाराज लोकरंजन
पुरस्काराने सन्मानित
कवठेमहांकाळ
सांगली कोल्हापूर लिंगायत माळी समाजाचे मार्गदर्शक व
शाहीर शहाजी लक्ष्मण माळी. ( लाटवडे ता. हातकणंगले जिल्हा.. कोल्हापूर ) यांना यावर्षीचा ” राजर्षी शाहू महाराज लोकरंजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
गेली चाळीस वर्षे शाहिरी क्षेत्रात कार्यरत असून या शाहिरी कलेतून इतिहास आणि मनोरंजन या क्षेत्रात कार्य केल्याबद्दल राजर्षी शाहू महाराज लोकरंजन पुरस्काराने माझा श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे हस्ते गौरव करण्यात आला.
शाहीर क्षेत्रात सलग चाळीस वर्षे कार्यरत आणि अनेक शाहीर निर्माण केले आहेत.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
फोटो ओळी
” शाहीर शहाजी माळी यांना राजर्षी शाहू महाराज लोकरंजन ”
पुरस्कार देताना श्रीमंत युवराज संभाजीराजे, अमर सरनाईक इतर मान्यवर