शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशीच्या बाल गटात १८० मल्लांचा सहभाग* *संपुर्ण नियोजनऑलिम्पिकच्या धर्तीवर*

Spread the news

*शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशीच्या बाल गटात १८० मल्लांचा सहभाग*

*संपुर्ण नियोजनऑलिम्पिकच्या धर्तीवर*

कागल :
येथील श्री.छत्रपती शाहू साखर कारखान्यामार्फत आयोजित मॕटवरील कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी बाल गटात १८० मल्लांनी सहभाग नोंदविला.कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून शाहू जयंती निमित्त घेण्यात येत असलेल्या या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते झाले.यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे ,सर्व संचालक,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •  

छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे,शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे व क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर यांच्या प्रतिमेसह मॕट पूजन घाटगे यांनी केले. खेळाडूंनी मानवंदना देऊन क्रीडा शपथही घेतली.सकाळी शाहू उद्यानातून खेळाडूंनी शाहू क्रीडा ज्योत कार्यस्थळापर्यंत आणली.
पंच म्हणून संभाजी वरुटे रामा माने,बटू जाधव,संभाजी पाटील, बाळासो मेटकर,नामदेव बल्लाळ, रवींद्र पाटील, प्रकाश खोत, के.बी.चौगुले, बापू लोखंडे, सुरेश लंबे,प्रकाश जमनिक,कृष्णात पाटीलगजानन खराडे,अशोक फराकटे, रामदास लोहार,संभाजी मगदूम आदी काम पाहत आहेत. राजाराम चौगुले व कृष्णा चौगुले यांनी निवेदन केले.

छायाचित्र कागल :येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यातमार्फत शाहू जयंतीनिमित्त आयोजित मॕटवरील कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे

चौकट
*संपुर्ण नियोजनऑलिम्पिकच्या धर्तीवर*

चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन ऑलिंपिकच्या धर्तीवर करण्यात आले आहे. दोन मॅटवर स्पर्धा सुरू आहेत. दोन्ही ठिकाणी संगणकीय गुणफलकासह कोच,आक्षेप सुविधा उपलब्ध आहेत.
तसेच कुस्ती शौकीनांना घरबसल्या या स्पर्धा पाहता येण्यासाठी महाखेल- कुस्ती हेच जीवन या फेसबुक पेज व युट्यूब चॕनेलवरून ऑनलाइन प्रक्षेपण सुरु आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!