शारंगधर देशमुख यांचे कार्य कौतुकास्पद
उद्योग मंत्री उदय सामंत यांचे उद्गार
वाढदिवसानिमित्त झाला भव्य सत्कार
कोल्हापूर :
समाज विधायक कार्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यरत नेतृत्व म्हणून माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त साने गुरुजी वसाहतीत आयोजित नागरी सत्कार समारंभात सामंत बोलत होते.
आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा भगवा कोल्हापूर पालिकेवर शारंगधर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निश्चित फडकेल असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. अध्यक्षस्थानी सत्यजित कदम होते.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी उपनगरांत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचा पाठपुरावा करून विकास कामे
मार्गी लावल्याने तीन वेळा विक्रमी मताने विजयी झाल्याचे मत व्यक्त केले. येणाऱ्या पालिका निवडणुकीत शिवसेना शिंदेगटाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणार असल्याचे मत व्यक्त केले.
वृद्धाश्रमात फळे वाटप वृक्षारोपण आदी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अद्वैत सूर्यवंशी यांनी कोल्हापूर थाळीच्या माध्यमातून मोफत जेवण वाटप केले.
यावेळी ऋतुराज क्षीरसागर, अभिजित खतकर, अशोक चौगुले, सुरज देशमुख अनिल इंगळे, गुरु जोशी, तात्या खेडकर, संजय सावंत, उदय सासणे, अभिजीत चव्हाण, कुलदीप सार्वतकर, अमर सुतकी, दीपक बराले यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून फोनवरून शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रास्ताविक योगेश पावले यांनी केले तर सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले आभार शरद पाटील यांनी मानले.