अबूधाबी ओपन मास्टर्स गेम्समध्ये शिल्पा जोशी यांची सुवर्ण कामगिरी

Spread the news

अबूधाबी ओपन मास्टर्स गेम्समध्ये शिल्पा जोशी यांची सुवर्ण कामगिरी

­

 

अबूधाबी येथे दि. ७ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडलेल्या Open Masters Games Abu Dhabi 2026 या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शिल्पा दीपक जोशी यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. जगभरातील सुमारे २५ हजार खेळाडूंच्या सहभागासह ३८ विविध क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या या भव्य स्पर्धेत ९२ हून अधिक देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
टेबल टेनिस स्पर्धेत ५५ वर्षांवरील महिला गटात शिल्पा जोशी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या अचूक फटकेबाजी व आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत हा मानाचा किताब मिळवला.
तसेच ४५ वर्षांवरील महिला दुहेरी गटात त्यांनी आपल्या जोडीदार डॉ. अनघा जोशी यांच्या समवेत रौप्यपदकाची कमाई केली. दोघींच्या समन्वयपूर्ण खेळामुळे भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले.
शिल्पा जोशी यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीमुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार आहे.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!