*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य शासनाच्या विरोधात तावडे हॉटेल, कोल्हापूर या ठिकाणी निदर्शने…*
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू साहेब व संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच सहसंपर्कप्रमुख विजयराव देवणे, राज्य संघटक नवेज मुल्ला, चंगेजखान पठाण, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, रविकिरण इंगवले, सुनील शिंत्रे, वैभव उगळे, सहसंपर्कप्रमुख हाजीअसलम सय्यद, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगलताई चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये *कोल्हापूर येथील तावडे हॉटेल चौकामध्ये राज्य शासनाच्या वादग्रस्त मंत्र्यांबाबत निदर्शने* करण्यात आली.
या निदर्शनामधून *राज्यशासनाच्या भ्रष्ट आणि कलंकीत मंत्र्यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी* करण्यात आली.
राज्य सरकार विरोधातील निषेधाच्या आंदोलनामध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी पदाधिकारी, युवासैनिक व इतर अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.