Spread the news

शिवाजी चौक मंडळाच्या अन्नछत्रास प्रारंभ

­

 

कोल्हापूर : प्रतिनिधी श्री जोतिबा यात्रेकरूंना पंचगंगा नदी घाटावर विसावा घेतल्यानंतर मोफत भोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून स्थापन झालेल्या शिवाजी चौक तरुण मंडळाच्या अन्नछत्राला मंगळवारी यात्रेच्या आदल्या दिवशी प्रारंभ झाला . पहिल्याच दिवशी तब्बल वीस हजार भाविकांनी भोजन प्रसादाचा लाभ घेतला . या अन्नछत्राचा प्रारंभ आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते तसेच गौरव कुसाळे , रामभाऊ बेंडके , महादेव धडाम , अनिल अधिक यांच्या उपस्थितीत झाला . स्वागत अध्यक्ष नंदकुमार वळंजु यांनी केले . आलेल्या भाविकांना जिलेबी मसालेभात कुरमा पुरी कांदा भजी पापड असे पंचपक्वान्न तसेच मुबलक स्वच्छ पाण्याची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली होती .या उद्घाटन सोहळ्याला जहांगीर अत्तार , शशिकांत कोकाटे , विजयराव सूर्यवंशी , अनिल हिराणी , दिलीपराव हजंगे , किशोर तांदळे , सुरेश कोरगावकर आणि मान्यवर उपस्थित होते .तर भक्तांना सकाळी चहा आणि अल्पोपहाराची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आली आहे अशी माहिती पटेल समाजाचे दिलीप धिंगाणी , केतन पटेल , विनोद पटेल यांनी दिली . यावेळी साताप्पा कांबळे , प्रमोद सावंत , प्रफुल्ल भेंडे , दिलीप खोत , सुनील कदम यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण नियोजन केले . * मोफत दुचाकी दुरुस्ती : दरम्यान यात्रेच्या दिवशी बुधवारी दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनच्या वतीने दुचाकी गाड्यांची मोफत दुरुस्ती आणि पंचर काढण्याची सेवा देण्यात येणार आहे . ही सेवा वाडी रत्नागिरी डोंगर मार्गावर शेवताई मंदिर , जुने आंब्याचे झाड , एसटी स्टँड , यात्री निवास यमाई मंदिर या ठिकाणी असणार आहे . अशी माहिती नाना गवळी , रवी कांडेकरी , बबन सावंत , विलास दळवी , माधव सावंत यांनी दिली .

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!