श्री विरभद्र अर्बन मल्टीस्टेट संस्थेची पहीली वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न…
कोल्हापुर : येथील श्री विरभद्र अर्बन मल्टीस्टेट को ऑप केडीट संस्थेची पहीली वार्षिक सर्वसाधारण सभा शुकवार दि. २५/०७/२०२५ रोजी दुपारी ४ वाजता चेअरमन संतोष कृष्णा जंगम यांचे अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली.
सभेच्या सूरवातीला संस्थेचे दैवत भगवान श्री विरभद्र यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करून मा. चेअरमन श्री. संतोष कृष्णा जंगम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज अखेर संस्थेने ३० कोटींचा व्यवसाय पूर्ण केला असून चालू अहवाल साली तो ५० कोटींचा करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. संस्थेचे मूख्य कार्यकारी अधिकारी अविनाश कुंभार यांनी नोटीस व अहवाल वाचन केले.
सभेमध्ये संस्थेचे सभासद राजवर्धन मोळे यांची नागपूर महानगरपालिका येथे सहाय्यक अभियंता पदी निवड झालेबददल तसेच शाहीर रंगराव पाटील यांना शाहीरभूषण पुरस्कार मिळालेबददल आणि पत्रकार रमेश पाटील यांची करवीर तालूका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी निवड झाले बददल संस्थेचे चेअरमन संतोष कृष्णा जंगम यांचे हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करणेत आला तसेच संस्थेच्या स्थापनेपासून वेळोवेळी ज्यांचे मार्गदर्शन लाभले असे सर्वश्री अॅड. शंकर गडगे साहेब, एस एस पवार चार्टर्ड अकौंटंट आणि सूभाष पाटील अंतर्गत लेखा परिक्षक यांचा ही सत्कार मा चेअरमन यांचे हस्ते करणेत आला. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन श्री कुमार गंगाधर हिरेमठ, सर्व संचालक, मा. सभासद व संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सूञ संचालन शाखा व्यवस्थापिका सौ. राजेश्वरी भोसले यांनी केले. शेवटी आभार व्यक्त करून पसायदानाने सभेची सांगता झाली