शुभम सुतार यांची “The Quiet Warmth” शिल्पकृती FACE 2026 – Society of Portrait Sculptorsसाठी निवड

Spread the news

कोल्हापूर : येथील शिल्पकार शुभम सुतार यांच्या शिल्पकृतीची लंडन येथे होणाऱ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शिल्पप्रदर्शनासाठी निवड झाली आहे. त्यांच्या “The Quiet Warmth” या शिल्पकृतीचा समावेश FACE 2026 – Society of Portrait Sculptors आयोजित वार्षिक प्रदर्शनात करण्यात आला आहे.

­

 

हे प्रदर्शन इंग्लंडमधील लंडन शहरातील The Garrison Chapel येथे 13 एप्रिल ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. जगभरातील निवडक कलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात प्रदर्शित होणार असून त्यामध्ये कोल्हापूरच्या कलाकाराचा सहभाग विशेष मानला जात आहे.

  •  

शुभम सुतार हे पोर्ट्रेट आणि फिगरेटिव्ह शिल्पकलेत कार्यरत असून मानवी भावना, व्यक्तिमत्त्व आणि सूक्ष्म तपशील वास्तववादी पद्धतीने साकारण्यामध्ये त्यांची स्वतंत्र शैली ओळखली जाते. “The Quiet Warmth” या शिल्पकृतीत मानवी भावविश्वातील शांतता आणि उबदारपणाचा कलात्मक आविष्कार त्यांनी साकारला आहे.

या आंतरराष्ट्रीय निवडीमुळे कोल्हापूरच्या कला क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कला रसिक आणि कलाकारांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरच्या शिल्पकलेला नवे व्यासपीठ मिळाले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!