सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालय महाराष्ट्रासाठी आदर्श : डॉ. रामलिंग माळी लॅम्प लाईटिंग व शपथविधी समारंभ उत्साहात संपन्न.

Spread the news

सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालय महाराष्ट्रासाठी आदर्श : डॉ. रामलिंग माळी
लॅम्प लाईटिंग व शपथविधी समारंभ उत्साहात संपन्न.

­

 

सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन अंतर्गत सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे बी.एस.सी.नर्सिंग ६ वी बॅच व जी.एन.एम. नर्सिंग ४ थी बॅच यांचा “लॅम्प लाईटिंग व शपथविधी समारंभ” परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन उपस्थितीत प्रेरणादायी व उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलचे अध्यक्ष डॉ. रामलिंग माळी व कोल्हापूर सर्कलचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना रामलिंग माळी बोलत होते.

  •  

डॉ. माळी पुढे म्हणाले, “नर्सिंग या व्यावसायिक कोर्ससाठी काही लोक आवड म्हणून येतात तर काही लोक नाईलाज म्हणून हा व्यवसाय निवडतात. पण नर्सिंग हे एक आदर्श क्षेत्र आहे. या क्षेत्राकडे आवडीने लक्ष देवून काम केल्यास निश्चितच आपण प्रभावी काम करू शकता. महाराष्ट्रातील अनेक शहरात हि सिद्धगिरी महाविद्यालया सारखे आदर्शवत व सुविधांनीयुक्त महाविद्यालय चालवणे अशक्यप्राय आहे. खर तर सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालय सर्वांच्यासाठी एक आदर्श महाविद्यालय ठरेल.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यावेळी म्हणाले, “नर्सिंग कर्मचारी यांची आरोग्य विभागात मागणी मोठी आहे. चांगले परीचारीक्तेचे शिक्षण घेतलेले आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ मिळणे हि दुरापास्त होत चालले आहे. सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालय केवळ नर्सिंग स्टाफ तयार करत नाही तर संस्कारांची जोड असणारी, सामाजिक ऋण म्हणून सेवा कार्यास तत्पर असणारी एक पिढी तयार करणारा स्त्रोत आहे. परमपूज्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली महान सेवा कार्य या ठिकाणी चालू आहे, त्यात शासन म्हणून नक्कीच आमचा वाटा असेल.”

या कार्यक्रमास परम पूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची पावन उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वामीजी म्हणाले,“काहीही विचार न करता आणि निरभय भावनेने जी सेवा केली जाते, तीच खरी सेवा असते. ती करण्यासाठी तुम्ही हे क्षेत्र निवडले आहे. हे अत्यंत पवित्र क्षेत्र आहे. यापेक्षा दुसरे पवित्र क्षेत्र असूच शकत नाही. ज्याची सेवा जन्मदात्यांनाही करता येत नाही, त्यांची सेवा करण्याचे सौभाग्य तुम्हाला लाभले आहे.”स्वामीजींच्या या हृदयस्पर्शी शब्दांनी विद्यार्थ्यांना सेवाभावाची नवी प्रेरणा दिली. यावेळी प्रस्तावना करताना विवेक सिद्ध यांनी सिद्धगिरी मठाचा १३५० वर्षांचा वारसा विशद करत मठाचे विविध प्रकल्प आणि नर्सिंग महाविद्यालयाचा प्रवास विशद केला. यावेळी आभार प्रदर्शन डॉ. वैशाली सावंत यांनी केले.

या कार्यक्रमास सिद्धगिरी संस्थान मठाचे ट्रस्टी प्रताप भोसले, सिद्धगिरी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या प्रा. रेगिना सातवेकर, उपप्राचार्य सुरज चोपडे, सिद्धगिरी संस्थान मठाचे कार्यकारी संचालक यशवर्धन बारामतीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी गुंडोपंत वड, सिद्धगिरी हॉस्पिटलच्या जननी विभागाच्या संचालिका डॉ. वर्षा पाटील, मानव संसाधन विभाग प्रमुख विवेक सिद यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सेवाधर्माची शपथ घेत ज्ञानाचा दीप हाती घेत आपल्या व्यावसायिक जीवनाचा नवा अध्याय सुरू केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लीना काळे व वर्षा साने यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!