श्री मायाक्कादेवी यात्रेतील पाच पालख्यांच्या भेटीचा नयनरम्य सोहळा भाविक मंत्रमुग्ध, बसवराज अलगुर महाराज यांची भविष्यातील संकटांची भाकणूक

Spread the news

श्री मायाक्कादेवी यात्रेतील पाच पालख्यांच्या भेटीचा नयनरम्य सोहळा

भाविक मंत्रमुग्ध, बसवराज अलगुर महाराज यांची भविष्यातील संकटांची भाकणूक

वळसंग. ( प्रतिनिधी) वळसंग गावातील नवीन श्री मायाक्कादेवी देवींची पारंपरिक यात्रा नुकतीच मोठया उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात झाली. या यात्रेचे वैशिष् वैशिष्टय म्हणजे विविध देवतांच्या पालख्याची एकत्रित भेट. या सोहयाने भाविकांना मंत्रमुग्ध केले

वळसंग येथील श्री मायाक्कादेवी यात्रेसाठी जत येथील श्री मायाक्कादेवी श्री भाग्यवंती देवी देवाची पालखी, जत येथील दुसर्यां आणखी श्री मायाक्कादेवी बिरोबा देव यांच्या पालख्या, अशा एकूण पाच पालख्या ढोल सनई -ताशाच्या निनादात गावातुन भाय मिरवणुकीने नेण्यात आले

  •  

आणि भक्ती भवानी सजवलेल्या वळसंग गावातून मायाका देवी पाचगटी ते गावच्या बस स्टॅन्ड पर्यंत घेण्यात आल्या वळसंग स्टॅन्ड येथे स्टॅन्ड चौकात या पाचही पालकांची भेट झाली यावेळी जेसीबीच्या साह्याने भंडाऱ्याची उधळण करत भाविकांनी आनंद उत्सव साजरा केला

बस स्थानक चौकात या पाचही पालख्यांची भेट झाली, यावेळी भंडाऱ्याची उधळण करत भाविकांनी आनंदोत्सव

मायाक्का मंदिरात पूजा व होम-हवन करण्यात आले, सायंकाळी महाआरतीनंतर पारंपरिक हेडाम खेळाचे आयोजन झाले, ज्यातून बसवराज अलगुर महाराज यांनी उपस्थित भाविकांसमोर दैवी हेंडामखेळ माध्यमातून वर्षभराचे भविष्य वर्तवले.

यात्रेच्या पालखी भेटीं यशस्वी आयोजनासाठी श्री मायाका देवी व श्री भाग्यवंती देवीचे पुजारी बसवराज अलगुर महाराज व सुवर्णाताई अलगुर ओम अलगुर आकाराम सरक,गिता भंडारे, शुभम भंडारे, पुजारी युवराज भंडारे, सदाशिव कांबळे,सुनिल बंडगर,शिवराज अलगुर, कार्तिक अलगुर, यांनी विशेष सेवा बजावली.

यात्रेनिमित्ताने  भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते

 

भाकणुकीचे मुख्य मुद्दे : पावसाचे आगमन व पावसात उष्णतेचा अनुभव

उन्हाळ्यात वैरण सोन्याच्या किमतीत विकली जाईल

पांढन्या धान्याचे उत्पादन पटेल, काळया धान्याचे उत्पन्न बादेल

– देशात महागाईचा भडका उडेत

अवघ्या नऊ वर्षाच्या मुलीला मातृत्य लाभेल

सरकारी सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी राजकीय नाथांमध्ये प्रचंड

चडा ओढ होईल

वादळाच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणात नुकसानीची शक्यता

मनुष्य जंगलात राहण्यास भाग पाडला जाईल व वन्यप्राणी मानवी वस्तीत येतील

– देश-विदेशात वाद होऊन बुद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल

पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत अधिक असेल

नातेसंबंधातील नितीमत्ता लयाला जाईल

बारा कोसांवर एक दिवा दिसेल, असे भविष्य सांगण्यात आले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!