स्टार एअरने कोल्हापूरला बेंगळुरू, हैदराबाद व नागपूर या मेट्रो सिटीशी विमान सेवेतून जोडले
कोल्हापूर: संजय घोडावत समूहाच्या स्टार एअरने नुकताच कोल्हापूर विमानसेवेचा मोठा विस्तार जाहीर केला आहे. या अंतर्गत दि १५ मे पासून कोल्हापूरहून बेंगळुरू, हैदराबाद आणि नागपूरसाठी थेट विमानसेवा सुरू केली जाणार आहे, जेणेकरून या मेट्रोसिटीशी जोडल्याने याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. यातून कोल्हापूरचा विकास अधिक बळकट होईल. यामुळे लोकांचा वेळ वाचेल. तसेच स्टार एअर कडून उच्च दर्जाची सुविधा प्राप्त होईल. असा विश्वास श्रेणीक घोडावत यांनी व्यक्त केला.
यासोबतच, १५ मेपासून स्टार एअरने कोल्हापूर–मुंबई–कोल्हापूर व कोल्हापूर–अहमदाबाद–कोल्हापूर या विद्यमान मार्गांवरील विमानसेवेत अधिक सुधारणा केली आहे. पूर्वीच्या ५० आसनी ERJ-145 विमानाऐवजी आता ७६ आसनी अधिक आरामदायक ERJ-175 विमानाचा समावेश करण्यात आला आहे. या बदलामुळे प्रवाशांना बिझनेस क्लासची सुविधा मिळणार असून प्रवास अधिक आनंददायी, सुखकारक व आरामदायक होणार आहे.
सध्या कोल्हापूरहून अहमदाबाद, मुंबई व तिरुपती या तीन ठिकाणी आठवड्याला १६ उड्डाणे करणाऱ्या स्टार एअरकडून आता १५ मेपासून बेंगळुरू, हैदराबाद आणि नागपूरसह आणखी तीन मार्गांची भर पडणार आहे. यामुळे कोल्हापूरहून एकूण सात शहरांकडे थेट विमानसेवा उपलब्ध होणार असून आठवड्यातील एकूण उड्डाणांची संख्या आता २८ वर जाणार आहे.
३ जूनपासून ही संख्या आणखी वाढवून आठवड्याला ३२ उड्डाणे करण्यात येणार असून अहमदाबाद, मुंबई, तिरुपती, बेंगळुरू, हैदराबाद, नागपूर आणि किशनगढ या सात शहरांसाठी विमानसेवा चालू असेल. विशेष म्हणजे, कोल्हापूरहून बेंगळुरू आणि मुंबईसाठी थेट विमानप्रवास ERJ-175 विमानामधून बिझनेस क्लाससह करता येणार आहे. स्टार एअरच्या या यशस्वी वाटचालीबद्दल घोडावत समूहाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी स्टार एअरच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
स्टार एअरने सलग सहा वर्षे अखंडित सेवा दिली आहे. स्टार एअर ही एकमेव प्रादेशिक विमान सेवा आहे ज्याने ही कामगिरी पूर्ण केली आहे. त्यांनी सुमारे 1.5 दशलक्ष (15 लाख) प्रवाशांना प्रवास सेवा दिली असून सध्या आठवड्यातून 300 नियमित फ्लाइट्सचे संचालन करत आहे. उन्हाळी हंगामात ही संख्या वाढवून 350 साप्ताहिक उड्डाणांपर्यंत नेण्याची योजना आहे. उडान योजने अंतर्गत दिलेले सर्व मार्ग यशस्वीपणे चालवणारी ही एकमेव प्रादेशिक विमान सेवा आहे. प्रवाशांची वाढती मागणी आणि प्रादेशिक प्रवासाच्या गरजांमुळे, स्टार एअरचा हा विस्तार भारतीय विमान सेवेसाठी अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर झाला आहे.
“कोल्हापूरहून आमचा विस्तार हे अधिकाधिक प्रादेशिक केंद्रांना कार्यक्षम, विश्वासार्ह आणि उच्च-आरामदायक हवाई सेवा देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. कोल्हापूरसारख्या शहरांना चांगली हवाई सेवा मिळायला हवी आणि आम्ही ती सेवा देणारे भाग्यवान आहोत. आमची वाढती विमानांची संख्या आणि प्रशिक्षित टीमसह, स्टार एअर भारताच्या सामान्य प्रवाशाला प्रामाणिकपणे उत्कृष्ट दर्जाची तत्पर सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत
असे कॅप्टन सिमरन सिंग टिवाना, सीईओ, स्टार एअर यांनी विस्ताराबद्दल सांगितले.