लिंगायत समाजाच्या विविध मागण्याबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेण्यासाठी प्रयत्न करणार जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम यांची ग्वाही लिंगायत माळी समाजाचा वधू वर मेळाव्यास भरघोस प्रतिसाद….

Spread the news

लिंगायत समाजाच्या विविध मागण्याबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेण्यासाठी प्रयत्न करणार

­

 

जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम यांची ग्वाही

  •  

लिंगायत माळी समाजाचा वधू वर मेळाव्यास भरघोस प्रतिसाद….

कोल्हापूर

लिंगायत माळी समाजाच्या मागण्यासंदर्भात मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यासाठी आपण प्रयत्न करू, शिवाय समाजाच्या सर्व उपक्रमाला मदत करू अशी ग्वाही जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीर कदम यांनी रविवारी दिली.

अखिल भारतीय वीरशैव माळी समाजोन्नती परिषद, सांगली, शिवप्रसाद विकास परिषद, सांगली व शिवप्रसाद नागरी सह. पतसंस्था मर्या., सांगली यांचे संयुक्त विद्यमाने लिंगायत माळी समाजाचा वधू वर मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या सुरवातीस प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन मेळाव्यास उपस्थित कोल्हापुर, पुणे, सोलापुर, मुंबई, उस्मानाबाद, लातुर तसेच कर्नाटकातील विविध जिल्हयातून आलेल्या लिंगायत माळी संघटनांचे पदाधिकारी व प्रमुख पाहूणे युवा नेते समीत कदम, प्रदेशाध्यक्ष, जनसुराज्य पक्ष यांचे शुभहस्ते करणेत आला.

मेळाव्यास उपस्थित समाजबांधव, वधू, वर मान्यवरांचे स्वागत शिवप्रसाद विकास परिषदेचे कार्याध्यक्ष उद्योजक श्री. उमाकांत माळी यांनी केले. त्यानंतर अखिल भारतीय माळी परिषदेचे अध्यक्ष माजी महापौर विजयराव धुळूबुळू यांनी प्रास्ताविक केले त्यामध्ये त्यांनी सर्व सामाजिक संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेतला. संस्थेच्या कामकाजाची माहीती देऊन संस्थेच्या भविष्यातील नियोजित कामकाजाची माहिती समाजबांधवांसमोर मांडली. त्यानंतर प्रमुख पाहूणे समीत कदम यांचा सत्कार संस्थेचे जेष्ठ संघटक तुकाराम पां. माळी (गुरूजी) यांनी केले. त्यानंतर प्रमुख पाहूणे कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी संस्था करित असलेल्या कार्याचा गौरव करून संस्थेचे वतीने भविष्यात राबविणार असलेल्या सर्व कार्याला आपल्याकडून संपूर्ण सहकार्य करण्याची हमी देऊन आयोजक संस्थांचे आभार व्यक्त केले.

  • संस्थेच्या सामाजिक कार्यास देणगी देणारे श्री. शिवाजी ई. दुर्गाडे, मिरज या दाम्पत्यांचा सत्कार युवा उद्योजक श्री सुरज साखरे यांचे हस्ते करणेत आला. त्याचबरोबर माळी मंगल कार्यालयाच्या सुयोग्य व्यवस्थापनाबद्दल प्रा. सचिन माळी यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करणेत आला. त्यानंतर वधू वर मेळाव्याच्या कामकाजास सुरूवात करणेत आली. मेळाव्यात उपस्थित नियोजित वधू-वर यांनी आपला परिचय दिला. मेळाव्यास सांगली, कोल्हापुर, सातारा, सोलापुर, लातुर, उस्मानाबाद, पुणे, मुंबई तसेच कर्नाटक सह इतर राज्यातुन वधू-वर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये सुमारे ८०० वधू-वराची नोंदणी झाली. कार्यक्रमाचे सुत्र संचलन महादेव माळी, इंजि. सुनिल माळी, सौ. निलिमा माळी, सौ, साधना माळी, अस्मिता येवारे, सौ. स्मिता माळी यांनी केले.
    या मेळाव्यास लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष गुरुबाळ माळी, मार्गदर्शक अण्णासाहेब माळी, राजेंद्र माळी महिला संघटनेचे अध्यक्ष वंदना माळी, माजी अध्यक्ष मीनाक्षी माळी, कार्याध्यक्ष विद्या माळी, माजी अध्यक्ष अशोक माळी, ज्येष्ठ संचालक तानाजी माळी, काशिनाथ माळी यांच्यासह विविध जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!