सुमन रमेश तुलसियानी चॅरिटेबल ट्रस्टकडून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला तीन बसेस मनिष रूपाणी, कौस्तुब गावडे यांची माहिती

Spread the news

सुमन रमेश तुलसियानी चॅरिटेबल ट्रस्टकडून

­

 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला तीन बसेस

  •  

मनिष रूपाणी, कौस्तुब गावडे यांची माहिती

 

 

कोल्हापूर :

१९८९ साली स्थापन झालेला सुमन रमेश तुलसियानी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई या ट्रस्टकडून येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला तीन विद्यार्थी वाहतूक बसेस देण्यात येणार आहेत. ही माहिती ट्रस्टचे प्रमुख मनिष रूपाणी व विवेकानंद संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुब गावडे, कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत दिली. हा कार्यक्रम २९ डिसेंबर रोजी होणार आहे.

 

यावेळी रूपाणी यांनी सांगितले की, सुमन रमेश तुलसियानी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई हा शिक्षण, आरोग्यसेवा, संस्कृती व समाजकल्याण या क्षेत्रांत भरीव योगदान देणारा एक अग्रगण्य सामाजिक उपक्रम आहे. सन्माननीय सुमन तुलसियानी व त्यांचे उद्योजक पती. रमेश तुलसियानी यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या ट्रस्टने गेल्या तीन दशकांत समाजातील हजारो गरजू, रुग्ण व विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य केले आहे.

आजपर्यंत सुमन रमेश तुलसियानी चॅरिटेबल ट्रस्टने देशभरात शिक्षण, आरोग्यसेवा व समाजकल्याण क्षेत्रात ₹२८० कोटींपेक्षा अधिक आर्थिक मदत उपलब्ध करून दिली असून, जात, धर्म किंवा पंथभेद न करता मानवतेच्या भावानेतून कार्य करण्याची सामाजिक बांधिलकी या ट्रस्टने जपली आहे.

याच सामाजिक बांधिलकीतून सुमन रमेश तुलसियानी चॅरिटेबल ट्रस्टकडून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांना शैक्षणिक विकासासाठी महत्त्वाचे सहकार्य प्राप्त झाले आहे. ज्ञानयात्रा या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत रा. शाहू महाराज हायस्कूल कोल्हापूर, स्वामी रामानंद भारती विद्यालय तासगाव व श्री भवानी विद्यामंदिर सातारा या संस्थांसाठी तीन बसेस देण्यात येणार आहेत. या शिवाय शाहूवाडी तालुक्यातील वारूळयेथील सुकुमार गुरूदास नागेशकर हायस्कूलला वीस संगणक देण्यात आली आहेत. त्यासाठी बारा लाख रूपये खर्च ट्रस्टने केला आहे. त्याचा लोकार्पण, बसेस अर्पण समारंभ संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे व रायगडचे कृष्णाजी महाडिक यांच्या उपस्थितीत होणार आहे.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!