सनराईज ओव्हर वळिवडे” हे सुशील गजवानी यांचं आत्मकथन प्रकाशन

Spread the news

“सनराईज ओव्हर वळिवडे” हे सुशील गजवानी यांचं आत्मकथन पुण्याच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फाउंटन प्रकाशन यांनी केलं आहे.

आपण उल्हासनगराबद्दल, तसेच मध्य प्रदेश गुजरात आणि राजस्थानमधील निर्वासित वसाहतींबद्दल ऐकलं आणि वाचलं आहे. पण या आत्मकथनात सुशील गजवानी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून कोल्हापूरमधील वळिवडे कॅम्प (छावणी) मधील सुरुवातीच्या वर्षांची अतिशय संघर्षपूर्ण आणि भावनिक पापुद्रे उलगडत जातात.

ही एक जगातील कितीतरी देशांनी अनुभवलेली युनिव्हर्सल (वैश्विक) कथा आहे. प्रत्येक विचारशील व्यक्तीची ही गोष्ट आहे. जगात कुठेही असलेल्या प्रत्येक निर्वासिताची ही कहाणी आहे.

    •  

सनराईज ओव्हर वळिवडे हे पुस्तक भारताच्या फाळणीवर आधारित इंग्रजी साहित्यातील एक मोठी पोकळी भरून काढतं.

विशेषतः सिंध प्रदेश संपूर्णपणे पाकिस्तानकडे गेल्यानंतर घरदार गमावलेल्या हिंदू सिंधीं च्या पुनरुत्थानासाठी केलेल्या संघर्षाचं हृदयद्रावक कथन आहे

फाळणीसारख्या चुकीच्या राजकीय निर्णयांचे दूरगामी परिणाम लाखो सिंधी बांधवांना कसे भोगावे लागले याचे विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे

विभाजनानंतर सिंधी निर्वासितांनी त्यांच्या प्रिय माय भूमी सिंधभूमीचं झालेलं नुकसान, त्यांच्या वेदना आणि विस्थापनाचे सत्य हे पुस्तक अत्यंत प्रभावीपणे उलगडते. ‘सनराईज ओव्हर वळिवडे’ हे आपल्याला प्रांजळपणे आणि वास्तवदर्शी पद्धतीने भारताच्या विभाजनाच्या वेदनादायी काळात घेऊन जाते.

हे आत्मकथन कोल्हापूरमधील वळिवडे येथील गांधीनगर निर्वासित छावणीवर आधारित आहे. ही कथा आहे हृदयद्रावक दुःखाची आणि विनाशाची — ज्याला सामोरे जाताना साध्या, सामान्य लोकांनी विलक्षण धैर्य, जिद्द आणि लवचिकता दाखवली. त्यांनी आपल्या दुर्दैवी विस्थापनाचा स्वीकार करत, नव्या पिढ्यांसाठी चांगले जीवन निर्माण करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

ही कथा आहे वेदनेची, जी नाकारलेपणाला समेटाशी जोडते, आणि सांस्कृतिक वारशाच्या गमावण्याला आत्मसन्मानाने नव्याने जीवन उभारण्याच्या प्रयत्नांशी जोडते.

बाजो आणि इतर सिंधी निर्वासितांनी भोगलेल्या यातना जगाला हे जाणवून देतात की, गृहयुद्धे आणि अहंकाराची लढाई किती व्यर्थ असते.

सुशील गजवानी यांचं सनराईज ओव्हर वळिवडे एक तीव्र आणि अंतःकरणाला हादरवून टाकणारं वास्तव उघड करते. फाळणीनंतर आपल्या प्रिय सिंध भूमीचा कायमचा विसर पडलेल्या सिंधी निर्वासितांच्या मानसिक आघाताचं अत्यंत प्रभावी आणि तपशीलवार चित्रण यात आहे.

“सनराईज ओव्हर वळिवडे” अत्यंत प्रामाणिकपणे आणि सखोलतेने भारताच्या फाळणीच्या वेदनादायी काळाचं चित्रण करतं,जे वाचकाच्या मनाला चटका लावणारं आहे.

बाजो आणि इतर सिंधी निर्वासितांनी भोगलेली वेदना आपल्याला याची प्रगल्भ जाणीव करून देते की अंतर्गत यादवी युद्धं आणि अहंकाराच्या संघर्षांचं शेवटी काहीही फलित नसतं.

सिंधी लोकांना अनेकदा उथळ ठरविले जातं, त्यांच्या अस्तित्वाला गृहित धरलं जातं, त्यांच्या मूळ ओळखीला समजून घेतलं जात नाही, ना मान्यता दिली जाते.

सनराइज ओव्हर वळीवडे सारख्या पुस्तकांमुळे सिंधी अनुभवाची समृद्ध, अनेक थरांची वास्तविकता समोर येईल; ज्यामुळे त्यांच्या संघर्षाचा आणि योगदानाचा खरा अर्थ उमगल्याशिवाय राहणार नाही.

सुशील गजवानी यांचं हे ओघवतं आणि संवेदनशील लेखन असलेलं सनराईज ओव्हर वळिवडे, फाळणीवरील साहित्यामध्ये
एक मौलिक आणि खोलवर प्रभाव टाकणारे तसेच
सिंध आणि त्याच्या दुर्दैवी विभाजनावर आधारित साहित्यसंपदेत
एक मोलाची भर घालणारं पुस्तक म्हणून नोंद घेतली जाईल असा विश्वास आहे

जगभरातील
निर्वासितांच्या दुःखावर संशोधन करणाऱ्या जगभरातील अभ्यासक सनराइज ओव्हर वळीवडे ची निश्चित दखल घेतील.

खरं म्हणजे आजवर देशाच्या फाळणीवर बरस बरंच साहित्य इतिहास लिहिला गेला आहे मात्र सिंधी समाजाच्या फाळणीनंतरच्या यातना वेदनांचे चित्रण करणारे वस्तुस्थिती मांडणारे साहित्य आजवर कोणी लिहिले नाही अथवा प्रकाशित झालेले नाही. या पार्श्वभूमीवर सनराईज ओवर वळीवडे हे पुस्तक मैलाचा दगड ठरेल, असा लेखक सुशील गजवानी यांना विश्वास आहे.

या पुस्तकाची फाळणी वरील दस्तऐवज म्हणून नोंद घेतली जाईल.अशा मौलिक योगदान देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन केल्याबद्दल या पुस्तकाच्या प्रकाशिका साज अगरवाल यांच्या प्रति पुस्तकाचे लेखक सुशील गजवानी यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!