“SurveyXplore” कार्यशाळेत प्रगत सर्व्हेयिंग उपकरणांचे प्रशिक्षण
वारणानगर (ता. पन्हाळा) :
तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय (डिप्लोमा), वारणानगर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात ‘SurveyXplore’ या प्रात्यक्षिक कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दिनांक १८ ते २० ऑगस्ट २०२५ रोजी ही तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटन समारंभ १८ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला.
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना ‘Total Station’ या आधुनिक सर्व्हेक्षण उपकरणाचा प्रात्यक्षिक परिचय देण्यात आला,दुसऱ्या दिवशी DGPS (Differential Global Positioning System), GIS (Geographic Information System) व इको साऊंडर यासारख्या प्रगत उपकरणांवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगजगतात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जवळून ओळख झाली.तिसऱ्या दिवशी ऑनलाईन टेस्ट, फीडबॅक सत्र व समारोप समारंभ पार पडला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आणि रोजगारक्षमतेला चालना देणारी ठरली. कार्यक्रमासाठी विविध कॉलेजेस मधून 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी तसेच विषय शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
या उपक्रमासाठी प्रमुख तज्ञ म्हणून श्री. अभिजीत चव्हाण (प्रोप्रायटर , Total Tech Surveyors & Consultants) यांनी प्रशिक्षण दिले. कार्यशाळेसाठी वारणा विभाग शिक्षण मंडळांचे अध्यक्ष माननीय आमदार डाॅ.विनयरावजी कोरे, व मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.व्ही. व्ही. कार्जिनी यांनी प्रोत्साहन दिले.तसेच प्राचार्य प्रो. पी. आर. पाटील, सल्लागार डाॅ.पी.एम. पाटील यांचे सहकार्य मिळाले.
या कार्यशाळेचे आयोजन विभागप्रमुख प्रो. एस. जे. संकपाळ , समन्वयक प्रो. पी. बी. फाळके आणि विभागातील सहकाऱ्यांनी केले.